चष्माला अलविदा…देशी कंपनीने आणला आय ड्रॉप, औषध टाकल्यावर विना चष्मा भन्नाट वाचा

चष्माला अलविदा…देशी कंपनीने आणला आय ड्रॉप, औषध टाकल्यावर विना चष्मा भन्नाट वाचा

चष्मा असणे काहींना आवडत नाही. त्यामुळे काही जण लेन्सचा पर्याय स्वीकारतात. देशातील अब्जावधी लोकांना चष्माचा वापर करावा लागतो. परंतु सर्वांना लेन्स वापरणे शक्य होत नाही. आता मुंबईतील एका कंपनीने चष्मापासून सुटका करुन देणारे औषध बनवले आहे. या कंपनीने बनवलेल्या आय ड्रॉपमुळे चष्माची गरज पडणार नाही. एंटोड फार्मास्यूटिकल्सकडून PresVu आय ड्रॉप विकसित केले आहे. DCGI ने एका नव्या आय ड्रॉपला मान्यता दिली आहे. या आयड्रॉपच्या एका थेंबामुळे दृष्टी सुधारत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वयानुसार होते दृष्टी कमी

प्रेसबायोपियाचा उपचार हे आय ड्रॉप करणार आहे. प्रेसबायोपिया वयानुसार होणार आजार आहे. 40 वर्षानंतर ही समस्या सुरु होते. यावेळी जवळचे वाचताना ही समस्या येते. त्यासाठी काही जण लेसरची शस्त्रक्रिया करतात. परंतु त्यात अजून प्रगती झाली नाही. आता एंटोड फार्मास्यूटिकल्स कंपनीने या आजारावर देशातील पहिलेच औषध आणल्याचा दावा केला आहे.

डोळ्यांना मिळणार आराम

PresVu आय ड्रॉपमध्ये एक विशेष फॉर्मूला वापरला आहे. त्यामुळे फक्त चष्मा वापरण्यापासून सुटका मिळणार नाही तर डोळेही ओलसर राहणार आहे. त्यामुळे डोळ्यांना आरामही मिळणार आहे. डॉक्टर धनंजय बाखले यांनी PresVu आय ड्रॉप मोठी उपलब्धी असल्याचे सांगत आहेत. यामध्ये एडवांस्ड डायनामिक बफर टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हे आय ड्रॉप लवकरच बाजारात येणार आहे. परंतु डॉक्टरांकडे डोळ्यांची तपासणी करुन त्यांच्या सल्ल्यानंतर याचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

तात्याराव लहाने यांनी स्पष्टपणे सांगितले…

प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितले की, या औषधाचा परिणाम सहा तास राहतो. सहा तासांत पुन्हा एक ड्रॉप टाकल्यास आणखी तीन तास ही समस्या सुटू शकते. म्हणजे नऊ तास विना चष्मा आपण राहू शकतो. त्या काळात वाचन किंवा कार्यालयात कामे करता येतात. हे आय ड्रॉप कायमस्वरुपी चष्मा घालवण्यासाठी नाही. केवळ काही तास विना चष्मा यामुळे आपण राहू शकते. हे औषध वापरण्यापूर्वी डॉक्टारांचा सल्ला घ्यावा. या औषधाचे काही दुष्परिणाम आहे. त्यात डोकेदुखी किंवा डोळे लाल होणे हे दुष्परिणाम होणार आहे, असे नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव पी. लहाने यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज