शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत पोहोचली लालबागच्या राजाला, अभिनेत्रीचे ‘ते’ साडीतील फोटो…

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत पोहोचली लालबागच्या राजाला, अभिनेत्रीचे ‘ते’ साडीतील फोटो…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शिल्पा शेट्टीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिल्पा शेट्टी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. हीट चित्रपट तिने बॉलिवूडला दिली आहेत. राज कुंद्रा याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शिल्पा शेट्टी ही अक्षय कुमार याला डेट करत होती. मात्र, अक्षय कुमार याने तिला धोका दिल्याचे सांगितले जाते. शिल्पा शेट्टी हिच्याकडून अक्षय कुमार याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर ज्यावेळी तो शिल्पा शेट्टी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता, त्याचवेळी तो अजून एका अभिनेत्रीला डेट करत होता.

अक्षय कुमार याच्यानंतर शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केले. मात्र, राज कुंद्रा याचे शिल्पा शेट्टी हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच पहिले लग्न झाले होते. राज कुंद्राने शिल्पासोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर थेट शिल्पा शेट्टी हिच्यावर घर तोडल्याचाही आरोप करण्यात आला. राज कुंद्राची पहिली पत्नी विदेशात असते आणि तिने शिल्पावर काही आरोपही केले होते.

आता नुकताच शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रा आणि तिच्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली आहे. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिने भगव्या रंगाची साडी घातल्याचे दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या आजूबाजुला मोठी गर्दी असल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे.

राज कुंद्रा देखील यावेळी खास लूकमध्ये दिसला. दरवर्षी शिल्पा शेट्टी ही आपल्या कुटुंबियांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचतात. कार्तिक आर्यन हा देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी पोहोचला होता.

आता शिल्पा शेट्टीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी फोटोवर कमेंट करून शिल्पा शेट्टी हिच्या लूकचे काैतुक केले आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच जिममधील एक व्हिडीओ शेअर केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय? अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय...
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल
हिंदी बिग बॉससाठी मराठी बिग बॉस लवकर संपणार? मराठी प्रेक्षक भडकले…
काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 6 कोटी, तुम्हालाही आवडेल असं काम करायला? वाचा सविस्तर…
इस्रायलने हिजबुल्लाहच्या कंमाडरचा केला खात्मा, संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्ते केली चिंता
छत्री घेऊनच बाहेर पडा, पुढच्या पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा