शाहरुख खानने विराट कोहलीला टाकलं मागे, पाहा यंदा कोणी भरला सर्वाधिक कर?

शाहरुख खानने विराट कोहलीला टाकलं मागे, पाहा यंदा कोणी भरला सर्वाधिक कर?

सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान नक्कीच आघाडीवर आहे. फॉर्च्युन इंडियाने काही दिवसांपूर्वी सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये किंग खानने बाजी मारलीये. फॉर्च्युन इंडियाने एक यादी जारी केली आहे. ज्यामध्ये सर्व स्टार्स किती टॅक्स भरतात हे सांगण्यात आले आहे. या यादीनुसार शाहरुखने यावर्षी सर्वाधिक कर भरला आहे. यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. किंग खानने तब्बल ९२ कोटी रुपयये कर म्हणून भरले आहे. त्याच्यानंतर सलमान खान, विराट कोहली, दक्षिणेचा सुपरस्टार थलपथी विजय यांचा नंबर लागतो. सलमान खानने 75 कोटी रुपये, अमिताभ बच्चन यांनी 71 कोटी रुपये, विराट काहोलीने 66 कोटी रुपये, एमएस धोनीने 38 कोटी रुपये, रणवीर कपूरने 36 कोटी रुपये, सचिन तेंडुलकरने 28 कोटी रुपये, हृतिक रोशनने 28 कोटी रुपये भरले आहेत. शाहिद कपूरने 14 कोटी रुपये, कतरिना कैफने 11 कोटी रुपये, कपिल शर्माने 26 कोटी रुपये, पंकज त्रिपाठीने 11 कोटी रुपये, अल्लू अर्जुनने 14 कोटी रुपये, आमिर खानने 10 कोटी रुपये आणि करीना कपूरने 20 कोटी रुपये टॅक्स म्हणून भरले आहेत,

शाहरुखची एकूण संपत्ती वाढली

2023 मध्ये शाहरुख खानच्या संपत्तीत 1300 कोटींची वाढ झाली आहे. जवान आणि पठाण यांच्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ८% ने वाढली. शाहरुखने यशराज प्रॉडक्शनसोबत ६० टक्के नफा शेअरिंग कॉन्ट्रॅक्टवर पठाण हा चित्रपट साइन केला होता. याशिवाय त्याने या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये वेगळे शुल्क आकारले होते. आता शाहरुख खानची संपत्ती 7000 कोटी रुपये झाली आहे. यानंतर शाहरुख खान चौथा श्रीमंत अभिनेता बनला आहे.

सलमान किती कमवतो

सलमान खानने 75 कोटींचा कर भरला आहे. त्यांची एकूण संपत्ती 2,900 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 100 कोटी शुल्क आकारतो आणि ब्रँड ॲन्डॉर्समेंटमधून वार्षिक ₹300 कोटी कमावतो. सलमानचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या टायगर 3 या चित्रपटाने जगभरात 466 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1990 च्या दशकात, सलमानची प्रतिमा रोमँटिक अभिनेत्यासारखी होती, जी 2000 च्या दशकात ‘भाई’मध्ये बदलली. तो ‘बीइंग ह्युमन’ या कपड्यांच्या ब्रँडचाही मालक आहे.

अमिताभ यांची जादू कायम

कौन बनेगा करोडपती, ब्रँड एंडोर्समेंट्समधून अमिताभ बच्चन यांनी सुमारे ₹8 कोटी कमावले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2024 Hurun India Rich List मधून अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती रु. 1,600 कोटी आहे. अमिताभ बच्चन यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे चित्रपट, टीव्ही शो- कौन बनेगा करोडपती आणि ब्रँड एंडोर्समेंट आहे. शेअर बाजारात देखील त्यांनी गुंतवणूक केली आहे. धर्मेंद्र, जितेंद्र यांसारख्या 80 च्या दशकातील बहुतेक ताऱ्यांची चमक कमी झाली आहे, पण अमिताभ यांची चमक अजूनही कायम आहे.

विराट अनेक ब्रँडचा चेहरा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विराट कोहली BCCI सोबत ग्रेड A+ कराराद्वारे वार्षिक 7 कोटी रुपये कमावतो. त्याला कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20साठी 3 लाख रुपये मॅच फीही मिळते. आयपीएलमध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) त्याला प्रत्येक हंगामात 15 कोटी रुपये देते. याशिवाय विराट कोहली अनेक ब्रँडचा चेहरा आहे. तो एका जाहिरातीसाठी 7.50 ते 10 कोटी रुपये आकारतो. तो PUMA, MRF सारख्या ब्रँडच्या जाहिराती करतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली मोठी शंका बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली मोठी शंका
बदलापूरमधील नामांकित शाळेतील चिमुकलींवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याचा मृत्यू...
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मला भीती होती फहाद अहमद…
Nanded News – मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, पाच जण जखमी
मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे म्हणणारा टीसी आशिष पांडेला रेल्वेने केले निलंबीत
इस्त्रायलने लेबनॉनवर रॉकेट डागले, 182 हून अधिक लोकांचा मृत्यू
ICC Women’s T20 World Cup 2024 – महिला विश्वचषकासाठी ICC ने जारी केले साँग, बोल आहेत…
Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती गंभीर