उदगीरात गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

उदगीरात गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

लातूरमधील उदगीर परिसरातील बनशेळकी रोड परिसरात अवैध गर्भपात होत असल्याची घटना घडत असल्याची चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी पाळत ठेवून उदगीर येथील बनशेळकी रोडवर असलेल्या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात एका पिडीत महिलेचा गर्भपात करत असताना रंगेहात पकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिलेली अधिक माहिती दिली, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग दोडके डॉक्टर आरती वाडीकर ,शहर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या टीमने अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यावर बनशेळकी रोड येथील चाचा हाॅटेल शेजारी असलेल्या क्लिनिक वरती छापा टाकला असता एका पीडित महिलेच्या चार महिन्याच्या गर्भपातीचे प्रक्रिया करत असताना आढळून आले. यावेळी गर्भपात करणारा डॉक्टर इरफान शमशोदीन मोमीन राहणार बाबा नगर निडेबन तालुका उदगीर याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले .सदरील पीडित महिलेस पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून गर्भपात गोळ्या ,औषधी, इंजेक्शन, सलाईन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सदर बोगस डॉक्टर मोमीन व त्यास गर्भपातासाठी रुग्ण पुरवणाऱ्या फरजान पठाण .मुसानगर यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे .याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते करीत आहेत.

गर्भलिंग निदान रॉकेट पुन्हा कार्यरत ?

उदगीर शहर व परिसरात गर्भलिंग चाचण्या व अवैद्य गर्भपात करण्याचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असल्याचे यावरून दिसून येते .या पीडित महिलेला अगोदरची एक मुलगी आहे. चार महिन्याची गरोदर असताना नेमका गर्भपात कोणी करायला लावला याचा तपास पोलीस करत आहेत .या महिलेने गर्भलिंग निदान चाचणी उदगीर शहरात केली होती की शेजारील कर्नाटक राज्यात केली होती ?याबाबतचा कसून तपास करण्यात येणार आहे. त्यात जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्या...
अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; झळकणार नव्या मालिकेत
सना खानने 7 वर्षांनी लहान मौलानाशी लग्न का केलं? अखेर केला खुलासा
17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात, घटना धक्क करणारी
दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ, रडत म्हणाली, माझ्या मुलाला…
Oscars 2025 – ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्कर 2025 मध्ये धमाकेदार एन्ट्री; ‘या’ श्रेणीत मिळाले नामांकन
देशातील 20 नद्या एकमेकींना जोडणार; ‘नाम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांची माहिती