लातूरमध्ये सोयाबीन काढणीवर पावसाचे संकट

लातूरमध्ये सोयाबीन काढणीवर पावसाचे संकट

पीक काढणीला येत असताना पीकांवर पावसाचे संकटाचे सावट आहे. काही काळ खंड दिलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतामधील सोयाबीन पिकाचे व काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे तर पिक काढणीला पावसामुळे अडचण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात नैराश्य निर्माण झाले आहे.

परिसरात मागे तीन आठवडे सतत झालेल्या पावसामुळे अगोदरच सोयाबीन पिकात पाणी साठले आहे. त्यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दोन वर्षापासून सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने व याही वर्षी पावसामुळे हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात अगोदरच निराशा पसरली होती. डोक्यावरील कर्जाचा वाढता डोंगर अजूनही वाढतच चालला आहे. मागील वर्षी परिसरातील शेतकर्‍यांना पीक विम्याच्या नावाखाली कंपनीकडून चार – पाच रुपये देऊन थट्टाच केली गेली. त्यातही सोयाबीनचा भाव दोन वर्षापासून पाच हजार रुपयांच्या वर जात नसल्यामुळे शेतीमध्ये खर्च करणे शेतकर्‍यांसाठी अवघड झाले आहे. या वर्षीही शेंग भरणीच्या वेळी सोयाबीनवर मर रोग, तसेच अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. जमिनीत साठलेल्या पाण्यामुळे पीक पिवळे पडले त्यामुळेही पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्ष सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी तरी सोयाबीनला चांगला भाव मिळेल या बेभरवशाच्या अपेक्षेपोटी तो सोयाबीन काढणीच्या धावपळीला लागला असतानाच एक महिन्यापासून विश्रांती घेत असलेल्या पावसाने शनिवारी दुपारपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार सुरुवात केली आहे. यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. काढलेले सोयाबीन सुध्दा पाण्यात बुडाले आहे. त्यातच पिकात पाणी साचल्याने व पावसाने पीक काढणीस मोठ्या अडचणी येत आहेत.

या वर्षी तरी योग्य भाव मिळेल, ही खोटी अपेक्षा मनात ठेऊन जोमाने काढणीला लागलेला शेतकरी मात्र आता पावसामुळे झालेल्या उत्पादन घटीच्या दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे परिसरातील सोयाबीन काढणी थांबली असून, अजुनही पावसाचे संकट काढणीवर घोंगावत आहे. सततची नापिकी, रोगराई आणि अस्मानी-सुलतानी संकटामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांना योग्य भाव व सरसकट कर्जमाफी मिळेल का.? अशी अपेक्षा शेतकर्‍यांमधून होताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य सलमान खान सोबत भिडण्याची ताकद ऐश्वर्यामध्येच होती – प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्या...
अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; झळकणार नव्या मालिकेत
सना खानने 7 वर्षांनी लहान मौलानाशी लग्न का केलं? अखेर केला खुलासा
17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात, घटना धक्क करणारी
दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ, रडत म्हणाली, माझ्या मुलाला…
Oscars 2025 – ‘लापता लेडीज’ या सिनेमाची ऑस्कर 2025 मध्ये धमाकेदार एन्ट्री; ‘या’ श्रेणीत मिळाले नामांकन
देशातील 20 नद्या एकमेकींना जोडणार; ‘नाम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांची माहिती