Ganeshotsav 2024 – एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, कोकणात वाजत-गाजत गणपती बाप्पाचे आगमन

Ganeshotsav 2024 – एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, कोकणात वाजत-गाजत गणपती बाप्पाचे आगमन

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत आज कोकणासहीत संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पाच्या आगमनावेळी सकाळी वरूणराजानेही हजेरी लावली मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. रत्नागिरी तालुक्यातील कर्ले-आंबेशेत घरगुती गणेश आगमनाची मिरवणूक वाजत-गाजत निघाली. या मिरवणूकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी आणि उपजिल्हाप्रमुख संजय साळवी या मिरवणूकीत सहभागी झाले. गणपतीबाप्पाचे आगमन शांततेत पार पडले. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. कोकण रेल्वेच्या गाड्यांना तुडुंब गर्दी आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांना ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय