अभ्यासक्रमातून लुटारू शब्द वगळणार का?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान काय?

अभ्यासक्रमातून लुटारू शब्द वगळणार का?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी करून लूट केली होती, असं पाठ्यपुस्तकातून शिकवलं जात आहे. मात्र, लूट या शब्दाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला मी कदापिही लुटारू म्हणणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. लुटारू या शब्दावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमातून लुटारू हा शब्द वगळणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज विघ्नहर्त्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अभ्यासक्रमातून लुटारू हा शब्द वगळणार का? शिवाजी महाराजांचा तो धडा वगळणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं स्पष्ट मत आहे की, महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही. त्यांनी कधीही लूट केली नाही. सर्वसामान्यांना त्यांनी कधी त्रास दिला नाही. इतिहासात जर काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजे. कारण शेवटी इंग्रज इतिहासकाराने हे वर्णन केलं आहे. इंग्रजांच्या नजरेतून महाराजांना पाहाण्याऐवजी आपल्या इतिहासकारांनी एकत्र यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं लिहिलं असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करावा, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

काल मुंबईत टीव्ही9 मराठीने कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी बोलताना शिवाजी महाराज खंडणी वसूल करायचे असं म्हटलं होतं. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. जयंत पाटील यांच्या माफीनाम्याची मागणीही केली आहे. या वादावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं. त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की, जे खऱ्या अर्थाने इतिहासाचे अभ्यासक आहे, सदानंद मोरे असीतल, शिवरत्न शेट्ये असतील… या सर्वांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं एकच म्हणणं आहे. माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

त्यांना सद्‌बुद्धी मिळो

बाप्पांना माहीतच आहे की, राज्याची प्रगती कोण करू शकतं? बाप्पांनी पाहिलंय. बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनीही पाहिलं आहे. मला वाटतंय बाप्पाचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. बाप्पांना मागावं लागत नाही, ते सर्व देतात, असं सांगतानाच बऱ्याच लोकांना सद्‌बुद्धी देण्याची आवश्यकता आहे. मी कुणाचे नाव घेत नाही. पण सर्वांना सद्‌बुद्धी मिळो ही बाप्पा चरणी प्रार्थना आहेच, असा टोला त्यांनी लगावला.

नागरिकांनी सजग राहावं

गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच धमक्या येतात. त्यामुळे पोलीस सावध आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही सजग राहिलं पाहिजे. नागरिकांनी डोळे उघडे ठेवले तर पोलिसांना मदत करू शकतात, असंही ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय