तानाजी सावंत यांच्या उलट्या होतात वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?

तानाजी सावंत यांच्या उलट्या होतात वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बाजूला बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा सुरु होती. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना समज दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

“आमच्या मंत्री महोदयांनाही मी सांगितलं, आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीत बेबनाव होईल, असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. ठिक आहे, कधीकधी काही गोष्टी, प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळा अनुभव येत असतो. त्यातून काही वक्तव्ये येत असतात. पण आपल्याला मी सांगतो, आमची महायुती आहे. महायुतीत भांड्याला भांडं लागतं. कुटुंबातही कधीकधी मतभेद होतात. पण आमचं स्वत: किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी महायुतीत अशाप्रकारचे बेबनाव होतील, असं होणार नाही. महायुती अबाधित आहे. महायुती चांगलं काम करत आहे. काही छोट्या-मोठ्या कुरबुरी आहेत. त्या मिटून जातील”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

अजित पवारांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे, त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आपली अजित पवार यांच्यासोबत गेले दोन-तीन दिवस चर्चा झाली नाही. ते दोन-तीन दिवस दौऱ्यावर होते. ते काल कॅबिनेटमध्ये नव्हते. मी कुठे काय बोललो आहे? प्रमुख माणूस कुठे काय बोलतोय? मी तर माझी भूमिका तुमच्यासमोर मांडली ना?”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणं किंवा कुणाचं नाव घेणं टाळलं. “आपण काम करत राहायचं. फळाची अपेक्षा करायची नाही. मी काम करतोय. कुठलं फळ मिळेल, या अपक्षेने मी काम केलं नाही. मला काय मिळेल, यापेक्षा मी राज्याला काय देईन, हे मी पाहिलं. माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आणि राज्य सरकारला काय फायदा होईल हे मी पाहिलेलं आहे. आम्ही टीम म्हणून मिळून काम करतोय. टीम म्हणून काम करत राहणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप
काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप यावेळी...
हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश
Nitesh Rane : धारावी मशीद प्रकरणावर नितेश राणेंच प्रक्षोभक वक्तव्य, ‘ही जी काय दादागिरी….’ Video
राजकारणात येणार का?; नाना पाटेकर यांचं उत्तर काय?; म्हणाले, मला पक्षातून काढून…
ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरही नाही वाचवू शकल्या ‘या’ सुपरस्टारच्या लेकाचे करिअर, अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही…
रिक्षावाल्याने रस्त्यावरच केले चुकीचे कृत्य, अभिनेत्री घाबरली, थेट रस्ताच…
Nagar News – विद्यार्थ्यांना दिले निकृष्ट दर्जाचे गणवेश; शाळांसाठी खर्च केलेल्या 1700 कोटींचे विवरण द्या, उच्च न्यायालयाचे आदेश