विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैसे उकळण्याच प्रयत्न; Girls College मधील 70 मुली अडचणीत

विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करून पैसे उकळण्याच प्रयत्न; Girls College मधील 70 मुली अडचणीत

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका सरकारी कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना घडली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती विद्यार्थीनींनी आपल्या वर्गमित्रांना सांगितल्यामुळे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्याभरापासूनच विद्यार्थिनींना धमकावून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. अज्ञात व्यक्ती अनोळखी क्रमांकावरून फोन करून विद्यार्थिनींना त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आहेत. आत्तापर्यंत सरकारी कन्या महाविद्यालयातील 70 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच 50 हून अधिक विद्यार्थिनींनी ब्लॅकमेलरला पैसे दिल्याचेही उघड झाले आहे. यासंदर्भात जबलपूरच्या सायबर सेलला तसते पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टेलीग्राम सारख्या ॲप्सचा वापर महाविद्यालयीन माहिती आणि परिपत्रक विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत टेलीग्राम ॲपच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे नंबर बाहेरून लीक होत असल्याचा संशय प्राचार्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांना पुढील तपास करण्याचे आदेशही दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Mumbai Bandra Worli Sea Link Suicide : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-वरळी...
50 खोके…, विरोधी पक्ष फोडायला…; ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील लक्षवेधी भारुड
‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला मोठा इतिहास, चाहत्यांचा उत्साह शिगेला
लेबनॉनमधील पेजर स्फोटाचे केरळ कनेक्शन, वायनाडमध्ये जन्मलेला रिनसन जोस चर्चेत, नक्की कारण काय?
आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांजवळ गांजाविक्री
राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरीवर मिंधे गटाचा दावा; पिंपरीवरून महायुतीत मिठाचा खडा
Badlapur sexual assault case – नराधम अक्षय शिंदेविरोधात 500 पानांची चार्जशीट