हिंदुस्थान आवडत नसेल तर इथे काम करू नका, दिल्ली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला खडसावले

हिंदुस्थान आवडत नसेल तर इथे काम करू नका, दिल्ली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला खडसावले

हिंदुस्थान आवडत नसेल तर इथे काम करू नका, आम्ही तुमचा हिंदुस्थानातील व्यवसाय थांबवू, सरकारला विकिपीडिया बंद करण्यास सांगू, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने आज विकिपीडियाला खडसावले. विकिपीडियाविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याशी संबंधित प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यूज एजन्सी एएनआयने जुलै 2024मध्ये विकिपीडियावर खटला दाखल केला होता.

विकिपीडियावर एएनआयचे वर्णन पेंद्र सरकारचे प्रचाराचे साधन म्हणून करण्यात आला. हा उल्लेख काढून टाकण्याची मागणी एएनआयने केली आहे. तसेच 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मागितली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेबद्दल विकिपीडियाच्या पेजवर लिहिले आहे की, एएनआयवर सध्याच्या केंद्र सरकारसाठी प्रचाराचे साधन म्हणून काम करण्याचा, बनावट बातम्यांच्या वेबसाईट्सच्या मोठय़ा नेटवर्पवरून सामग्री वितरित केल्याचा असे अनेक आरोप करण्यात आले आहेत.

विकिपीडियाला नोटीस

या प्रकरणी न्यायालयाने 20 ऑगस्ट रोजी विकिपीडियाला एएनआय पेज संपादित करणाऱया तीन सदस्यांची माहिती देण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप करत एएनआयने 5 सप्टेंबर रोजी विकिपीडिया विरोधात अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिकेवर उच्च न्यायालयाने विकिपीडियाला नोटीस बजावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Mumbai Bandra Worli Sea Link Suicide : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-वरळी...
50 खोके…, विरोधी पक्ष फोडायला…; ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील लक्षवेधी भारुड
‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला मोठा इतिहास, चाहत्यांचा उत्साह शिगेला
लेबनॉनमधील पेजर स्फोटाचे केरळ कनेक्शन, वायनाडमध्ये जन्मलेला रिनसन जोस चर्चेत, नक्की कारण काय?
आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांजवळ गांजाविक्री
राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरीवर मिंधे गटाचा दावा; पिंपरीवरून महायुतीत मिठाचा खडा
Badlapur sexual assault case – नराधम अक्षय शिंदेविरोधात 500 पानांची चार्जशीट