सिगारेट, वाढलेले केस अन् दाढी; कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ टीझरची झलक; अभिनेत्री कोण?
सुंदर गाण्यांनी भरपूर असा म्युजिकल चित्रपट ज्याने त्यावेळी सर्व रेकॉर्ड तोडले होते तो चित्रपट म्हणजे आदित्य रॉय कपूर अन् श्रद्धा कपूरचा ‘आशिकी 2’ . ‘आशिकी 2’ हा एक 2013 ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची गाण्यांची छाप आजही तेवढीच प्रेक्षकांच्या मनावर आहे.
‘आशिकी 3’ च्या टीझरची झलक
‘आशिकी 2’ नंतर सर्वांना प्रतिक्षा होती ती ‘आशिकी 3’ ची. प्रेक्षकांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे असं दिसत आहे. कारण याचाच एक अंदाज देणारा टीझरची रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहाता हा ‘आशिकी 3’चाच आहे असं म्हटलं जात आहे. या टीझरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन दिसत असून त्याच्यासोबत ‘पुष्पा 2’ फेम अभिनेत्री श्रीलीला आहे.
कार्तिक आर्यनने शेअर केली पोस्ट
कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडियावर टीझरचा पहिली झलक शेअर केली आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या रोमँटिक-संगीतमय चित्रपटाची ही झलक पाहून प्रेक्षकंची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
टीझर पाहिल्यानंतर ‘आशिकी 2’ ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, परंतु चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. पण टीझर पाहिल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे की हा ‘आशिकी 3’ चाच टीझर आहे.
कार्तिक आर्यनचा हटके लूक
‘आशिकी 2’ मध्ये ज्याप्रमाणे आदित्य रॉय कपूर स्टेजवर गायकाची भूमिका साकारताना दिसला होता, त्याचप्रमाणे या टीझर व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनही त्याच भूमिकेत दिसत आहे. लांब केस, लांब दाढी, हातात गिटार, कार्तिकचा हा हटके लूक फारच आकर्षक वाटत आहे. निर्माते या चित्रपटाचे शीर्षक कधी जाहीर करणार याची सर्वजण वाट पाहत आहे.
चित्रपटाचे शीर्षक काय असणार?
जरी हा चित्रपट ‘आशिकी’ च्या फॉरमॅटवर आधारित असला तरी चित्रपटाबद्दलचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या चित्रपटाला ‘आशिकी 3’ असे शीर्षक मिळेल का? कारण निर्माते भूषण कुमार यांच्याकडे ‘आशिकी’ या शीर्षकाचे कॉपीराइट नाही. त्याचे कॉपीराइट मुकेश भट्ट यांच्याकडे आहे. त्यामुळे आता चित्रपटाला नेमकं काय शीर्षक मिळणार याचीही उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये असणार आहे.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List