धनंजय मुंडेंचा तर आरोपींना वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न, अंजली दमानिया यांनी पुन्हा तोफ डागली, केली ही मोठी मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय देशमुख यांच्या जवळचा वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा दावा सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर याप्रकरणात सातत्याने कराड आणि मंत्री मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर दोघांवर आणि पोलिसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यांनी याप्रकरणात आता मोठी मागणी केली आहे.
काय म्हणाल्या दमानिया?
“तर मुळात कसं आहे की या लोकांनी ना मुद्दाम राजकीय दबाव होता म्हणून या तीन वेगवेगळ्या केसेस केल्या होत्या त्याच्यात खंडणी वेगळी होती ॲट्रॉसिटी वेगळी होती आणि हत्या वेगळी होती. पण आता या तिन्ही एकत्र आल्यामुळे आपल्याला आता खात्री पटली आहे की. याच्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव हा होता आणि तो धनंजय मुंडे यांचा होता म्हणून पहिल्या दिवशीपासून मी जे म्हणत होते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे ते तेवढ्यासाठी पण आज सिद्ध झालंय की ही तीन वेगवेगळे प्रकरण कधीही नव्हती. सुरुवात झाली 29 नोव्हेंबरला त्याच्यात आधी खंडणी मागितली गेली. सुदर्शन घुले याच्या फोनवरून कराड याने हा प्रकार केला. त्यानंतर सहा तारखेला तिथे गेल्यानंतर जी मारामारी झाली त्या मारामारी त्यांच्यावर अधिक खरं सगळे सेक्शन लागले होते. पण त्यांची बेल करायला बालाजी तांदळे नावाचा एक माणूस पोहोचतो. या सगळ्यांची बेल करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सात तारखेला सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराडचे बोलणे होते. संतोष देशमुख सारखी माणसं आडवी यायला लागली तर त्यांचा काढा काढायला हवा, असे ते ठरवतात.” असे दमानिया म्हणाल्या.
आठ तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे तिरंगा हॉटेलमध्ये भेटतात आणि ते तिरंगा हॉटेलमध्ये भेटून चर्चा करतात की संतोष देशमुख जर आडवा आला तर त्यांना संपायचं. मला ना ही भाषा आणि हे सगळं बघून इतका राग इतकी चिड येते की ही माणसं नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे, असे दमानिया म्हणतात.
काय केली मागणी
वाल्मिकी कराड याला फाशी द्यावी आणि धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ही शुड ऑल शो मी ट्राईड पण अशा लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न धनंजय मुंडे ने केला होता, असा आरोप दमानिया यांनी केला. अशा सिंडिकेटला मोठं करणारे धनंजय मुंडे जे मी परत परत म्हणत होते त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि कुठला नैतिकता येते त्याची आपण अपेक्षा अशा माणसांकडून करू शकत नाही आता जर लाज वाटत असेल तर फडणवीस आणि अजित पवारांनी तातडीने यांचा राजीनामा घ्या. देत नसतील तर त्यांना बडतर्फ करावं अशी थेट मागणी त्यांनी केली.
आरोपींच्या वकिलाची प्रतिक्रिया काय?
याप्रकरणी वकील राहुल मुंडे यांनी बाजू मांडली. 1400 पानाचं चार्जशीट आहे, कुठल्याही वकिलाला 2-4 दिवस लागतात. चार्जशीट मध्ये आरोपीचा सहभाग आहे की नाही, कुठलाही वकिल या स्थितीला सांगू शकत नाही. कुठेही असं दिसून आलं नाही, न्यूज चॅनेल कुठल्या निकषांवर बोलत आहे माहिती नाही. कुठल्याही क्षणाला अजून दावा करू शकत नाही. मीडियाच्या दाव्यावर मी बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.
कोणतंही आम्ही वाचलं त्यात काही दिसलं नाही. न्यूज चॅनल चालवतंय ते कोणत्या आधारे माहीत नाही. चार्जशीट वाचली. ७०० पानाची आहे. दोन किंवा चार तासात वाचता येणार नाही. त्याला वेळ लागमार आहे. आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही त्याचं विश्लेषण करू. नेमका सहभाग दिसून येतो का, पुरावे आहेत की नाही. या स्टेजला कोणताही वकील विश्लेषण करू शकत नाही. फक्त दावा मीडियात होतोय. ऑथेंटिक व्यक्तीने दावा केला नाही, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List