Milk Termeric Face Pack: बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…
आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारी दीर्घकाळ घराबाहेर राहिल्यामुळे तुम्हाला सनबर्न सारख्या समस्या उद्भवतात. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती करडी आणि निस्तेज दिसू लागते.
आजकाल त्वचेची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खराब दिसू लागते. बदलत्या ऋतूमधये त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात. चमकदार त्वचेसाठी तुम्ही पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करतात. परंतु, मार्केटमधील फेशियलमुळे आणि त्यामधील रसायनिक पदार्थांमुळे तुमच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. निरोगी आणि निस्तेज त्वचेसाठी तुम्ही त्यावर दुध आणि हळदीचा फेस पॅक वापरू शकता. या मास्कचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात आणि चेहरा अनखी चमकदार बनतो.
दूध आणि हळदीचा फेस पॅक कसा बनवायचा?
1) फेस मास्क बनवण्यासाठी प्रथम हळदीमध्ये कच्चे दूध घाला.
2) आता त्यात मध मिक्स करूण चांगले फेटून पेस्ट तयार करा.
3) तुमचा कच्चा दूध आणि हळदीचा फेस मास्क तयार आहे.
4) तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा जेणेकरून संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना ऍलर्जी होणार नाही.
5) जर त्वचा लाल झाली, पुरळ उठली किंवा खाज सुटली तर हा मास्क वापरू नका.
6) या फेस पॅकच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
दूध आणि हळदीचा फेस पॅक लावण्याचे फायदे
दुधाचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेच्या मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानास प्रतिबंध करण्यास मदत होते. कच्च्या दुधामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी कमी होण्यास मदत होते. या फेस पॅकचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटिबॅक्टिरियल आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे हायपर पिग्मेंटेशनच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर हळद आणि दूधाचा फेस पॅक वापरल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते. हळदीमधील औषधी गुणधर्म तुमच्या त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. परंतु तुमची त्वचा जर संवेदनशिल असेल तर या पॅकचा वापर जास्त प्रमाणात करू नये.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List