उमेश गुप्ताचे ‘महाराष्ट्र श्री’वर शिक्कामोर्तब, गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात

उमेश गुप्ताचे ‘महाराष्ट्र श्री’वर शिक्कामोर्तब, गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात

मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वापाच फूट उंचीच्या मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने गतविजेत्या हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र श्री’वर आपल्या नावाची मोहोर उमटवली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्याच रेखा शिंदेने बाजी मारली. गेल्या वर्षीही तिनेच ‘मिस महाराष्ट्र’चा मान मिळवला होता. पुरुषांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकारात पुण्याच्या नरेंद्र व्हाळेकर आणि शुभम पवार यांनी अव्वल स्थान पटकावले. चार गटांत सुवर्ण पदक पटकावणाऱया मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी सांघिक विजेतेपदाचा मानही संपादला.

पुण्यातील थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या ‘महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत गणेश आणि क्रीडाभक्तांना पीळदार थराचा अनुभव घेता आला. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’साठी स्टेजवर नऊही गटविजेते उतरले तेव्हा सर्वांचा नजरा कमलेश अच्चरा आणि हरमीत सिंगकडे वळल्या होत्या. या दोघांपुढे उंचीने कमी असलेला उमेश गुप्ता पीळदार वाटत होता. त्याची उंची, त्याच्या स्नायूंचे आकारमान निश्चित कमी होते, पण त्याच्या आखीवरेखीवपणा आणि पीळदारपणाने त्याला महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाचे ऑस्कर जिंकून दिले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा त्याने आपले गेले अपयश धुऊन काढताना ‘महाराष्ट्र श्री’चा मान पटकावला.

या दिमाखदार स्पर्धेत विजेत्यांवर तब्बल दहा लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. पुरस्कार सोहळा आयोजक नवनाथ काकडे, आमदार राहुल कूल, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, आयबीबीएफचे व एबीबीएफचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस अजय खानविलकर, खजिनदार सुनील शेगडे, राजेश सावंत, राजेंद्र सातपूरकर, नरेंद्र कदम, विशाल परब यांच्या उपस्थितीत पार पडला.

‘महाराष्ट्र श्री 2025’’ स्पर्धेचा निकाल

n 55 किलो वजनी गट ः 1. हनुमान भगत (रायगड),
2. जुगल शिवले (रायगड), 3. राजेश तारवे (मुंबई),
n 60 किलो ः 1. संदीप सावळे (मुंबई उपनगर),
2. बाळू काटे (पुणे), 3. सुयश सावंत (मुंबई उपनगर),
n 65 किलो ः 1.उदेश ठाकूर (रायगड), 2. सचिन सावंत (पुणे), 3.नदीम शेख (मुंबई),
n 70 किलो ः 1.उमेश गुप्ता (मुंबई उपनगर),
2. संकेत भरम (मुंबई उपनगर), 3. प्रशांत कोराळे (पुणे),
n 75 किलो ः 1.गणेश उपाध्याय (मुंबई उपनगर),
2.भगवान बोराडे (मुंबई उपनगर), 3. उदय देवरे (रायगड),
n 80 किलो ः 1.कमलेश अच्चारा (पुणे), 2. संजय प्रजापती (मुंबई उपनगर), 3. आमेर पठाण (छत्रपती संभाजीनगर),
n 85 किलो ः 1. प्रभाकर पाटील (रायगड), 2.अक्षय शिंदे (पुणे), 3. फिरोज शेख (पुणे),
n 90 किलो ः 1.सोहम चाकणकर(पुणे), 2.अभिषेक लोंढे (मुंबई उपनगर), 3. सुखमीत सिंग (रायगड),
n 90 किलो वरील ः 1.हरमित सिंग (मुंबई उपनगर),
2. नीलेश रेमजे (मुंबई उपनगर), 3.प्रवीण खोब्रागडे (पुणे),
n किताब विजेता ः उमेश गुप्ता (मुंबई उपनगर)
n उपविजेता ः कमलेश अच्चरा (पुणे)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पीओपी मूर्तींवर पूर्णत: बंदीच्या निर्णयाने मूर्तीकार नाराज, ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा पीओपी मूर्तींवर पूर्णत: बंदीच्या निर्णयाने मूर्तीकार नाराज, ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा
मुंबई महानगरपालिकेने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या...
महत्त्वाची कामे नकोच… सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?
IND vs PAK: भारताच्या विजयानंतर अनुष्काकडून पती विराट कोहलीवर प्रेमाचा वर्षाव, पहा पोस्ट
लग्न, घटस्फोट, कुटुंबावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य, नाव न घेता कोणावर साधला निशाणा
हे चित्रपटात का दाखवलं नाही? ‘छावा’मधील डिलिट केलेल्या सीनवर प्रतिक्रियांचा वर्षाव
‘छावा’ सिनेमाला रविवारी बसला मोठा फटका, बॉक्स ऑफिसवर का मंदावला सिनेमाच्या कमाईचा वेग?
फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला मतदान केलंय – सुरेश धस