Maha Kumbh Stampede – लोकं मरणाच्या दारात येऊन टेकलेत…; पाहा इन्फ्लुएन्सरने सांगितली शाही स्नानावेळची खरी परिस्थिती

Maha Kumbh Stampede – लोकं मरणाच्या दारात येऊन टेकलेत…; पाहा इन्फ्लुएन्सरने सांगितली शाही स्नानावेळची खरी परिस्थिती

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात आज पहाटे चेंगराचेंगरी होऊन 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी अमृतस्नान करण्यासाठी गर्दी केली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे ही दुर्दैवी घटना घडली. महाकुंभसाठी गेलेल्या अनेक इन्फ्लुएन्सरनी तेथील परिस्थितीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एका महिला इन्फ्लुएन्सरने कुंभमेळ्यातील भीषण परिस्थिती समोर आणली. किशोरी असे या तरुणीचे नाव आहे. किशोरी महाकुंभमेळ्यात उपस्थित असून तेथील व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. दरम्यान, तिने अमृतस्नाना दरम्यानचाही व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतून तिने कुंभमेळ्यातील सद्य परिस्थितीची माहिती भाविकांना दिली आहे.

मी महाकुंभचे रिअल टाईम अपडेट तुम्हाला देतेय. माझी तुम्हाला विनंती आहे. पवित्र स्नानाच्या दिवशी महाकुंभला जराही येऊ नका. आज मौनी अमावस्येचं पवित्र स्नान आहे. इथली परिस्थिती खूपच भयंकर झाली आहे. लोक एकमेकांच्या अंगावर पडत आहेत. लोकं अक्षरश: मरणाच्या दारावर टेकलेत. इथला एकूण एक व्यक्ती स्वत: जीव वाचवण्यासाठी धडपड करतोय. कोणीच कोणाची मदक करत नाहीए. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय, प्लीज येऊ नका. तरी तुम्हाला जर यायचं असेल तर संगम घाटावर जराही येऊ नका. यायचंच असेल तर अरेल घाट, यमुना घाट, गंगा घाटावर जा. मला वाटतं पुण्य कमावलं नाही तरी चालेल, जीव वाचवणं जास्त गरजेचं आहे, असे ती या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मला सैफ अली खानकडे घेऊन चला; हल्ला प्रकरणात संशयित ताब्यात घेतलेल्या तरूणाची मानसिक स्थिती बिघडली मला सैफ अली खानकडे घेऊन चला; हल्ला प्रकरणात संशयित ताब्यात घेतलेल्या तरूणाची मानसिक स्थिती बिघडली
सैफ अली खानवर हल्लाप्रकरणी रोज काहीना काही नवीन अपडेट येताना दिसतात. पकडलेल्या हल्लेखोराची तसेच या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे....
वयानुसार रोज किती मखाने खावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
लहान वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यात? फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय
हे सरकार जनतेचे नाही तर हपापलेल्या राजकारण्यांचे, आदित्य ठाकरे यांनी फटकारले
महायुती सरकारने चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढला! माध्यान्ह भोजनातून अंडी, साखर बंद करणार
फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे: नाना पटोले.
व्हायरल गर्ल मोनालीसा भोसलेला रुपेरी पडद्यावर झळकणार, बॉलीवुडमधील डायरेक्टरने दिली चित्रपटाची ऑफर