Cabinet expansion : ज्याला प्रचाराच्या पहिल्याच सभेत एकनाथ शिंदेंनी दिला मंत्रिपदाचा शब्द, त्याच नेत्याचा केला पत्ता कट, नेमकं काय घडलं?

Cabinet expansion : ज्याला  प्रचाराच्या पहिल्याच सभेत एकनाथ शिंदेंनी दिला मंत्रिपदाचा शब्द, त्याच नेत्याचा केला पत्ता कट, नेमकं काय घडलं?

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळू शकली नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली.

यामध्ये भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छूक होते, आपल्यालाही मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. पंरतु त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून यावेळी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर या बड्या नेत्यांना यावेळी मंत्रिपद देण्यात आलं नाही.

दरम्यान तानाजी सावंत यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत तानाजी सावंत यांना शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता. तानाजी सावंत यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. ‘तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी’ असं एकनाथ शिंदे यांनी भरसभेत म्हटलं होतं. मात्र आता तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकलं आहे. मंत्रिपद मिळालं नसल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची बातमी समोर येत आहे.

शिवसेनेत कोणाचा पत्ता कट 

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि विजय शिवतारे यांचा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाहीये.  त्यामुळे आता शिवेसना शिंदे गटात नाराजी असल्याचं समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात उद्या शरद पवार आणि छगन भूजबळ एकाच मंचावर, नाराज भूजबळांच्या भुमिकेकडे लक्ष पुण्यात उद्या शरद पवार आणि छगन भूजबळ एकाच मंचावर, नाराज भूजबळांच्या भुमिकेकडे लक्ष
उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत....
बीएसएफ बांगलादेशातील दहशतवाद्यांना बंगालमध्ये घुसू देत आहेत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कधी? विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
दोन अफेअर,10 वर्ष रिलेशनशिप; तरीही 53 वर्षीय तब्बू सिंगलच का राहिली? कारण विचारताच अभिनेत्रीनं घेतलं तिसऱ्याचं अभिनेत्याचं नाव
सतत चिडचिड होतेय, रडू येतय, मूड नाहीये? ‘हे’पदार्थ नक्की खा, लगेचच व्हाल एकदम फ्रेश
मराठीचा आग्रह धरला म्हणून तरुणाला मागावी लागली माफी, मुंब्र्यातली धक्कादायक घटना
खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना सरकारने काढावी, अंबादास दानवेंची मागणी