Ind Vs Aus जसप्रीत बुमराहवर ऑस्ट्रेलियात वर्णभेदी टीका, महिला कॉमेंटटरच्या त्या शब्दाने उफळला वाद
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वर्णभेदी टीका झाल्याचे समोर आले आहे. इंग्लंडची माजी क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्स समालोचक इसा गुहा हिने जसप्रीत बुमराहबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद उफळला आहे.
तिसऱ्या कसोटीदरम्यान ब्रेट ली सोबत समालोचन करत असताना ब्रेटलीने इसाला बुमराहबाबत एक प्रश्न केला. त्यावर इसा म्हणाली की जसप्रीत बुमराह हा Most Valuable Primate असं म्हणाली. प्राईममेट याचा अर्थ माकड असा होतो. सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांती अवस्थेतील काळाला प्राइमेट्सचा काळ म्हणतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List