हिंसाचाराच्या विरोधात महिलांचा जागर
‘हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है,’ ‘महिला शक्ती आयी है, नई रोशनी लायी है,’ असे म्हणत हातात घुंगराच्या काठय़ा घेऊन महिला हिंसाचाराच्या विरोधात घोषणा देत, महिला सक्षमीकरणाची गाणी गात, पुण्यातील महिला-मुली शनिवारी रस्त्यावर उतरल्या. यावर्षी 16 डिसेंबरला दिल्लीतील निर्भया प्रकरणाला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शहरातील महिला जागर समितीच्या वतीने या ‘जागरमोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी संध्याकाळी महात्मा फुले वाडय़ातील समाजसुधारक सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली होती. आमदार नितीन राऊत, शोभा करांडे, अॅड. असुंता पारधे, प्रियंका रणपिसे, शारदा नितनवरे, संगीत तिवारी, नीता रजपूत, प्राची दुधाने, स्मिता शेट्टी, संगीत पटणे. नीलिमा राऊत यावेळी उपस्थित होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List