Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष

तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे आणि फ्लॉसिंग करणारे तसेच तोंडाचे आरोग्य नीट राखणाऱ्यांना कॅन्सरचा धोका कमी होतो. अमेरिकन संशोधकांच्या मते तोंडाची स्वच्छता न केल्याने केवळ डायबिटीज आणि हायब्लड प्रेशर वाढवत नाही तर डोक्याचा आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे ओरल हेल्थबद्दल कोणतीही हलगर्जी महागात पडू शकते.

काय झाले संशोधन

एका अभ्यासात कॅन्सरचा धोका आणि तोंडातील काही बॅक्टेरियात काही तर कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. NYU लॅंगोन हेल्थ आणि त्याच्या पर्लमटर कॅन्सर सेंटरच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली अभ्यास झाला. त्यात आढळले की तोंडात असलेल्या शेकडो बॅक्टेरीया पैकी एक डझनाहून अधिक प्रकारचे बॅक्टेरिया डोकं आणि मानेच्या स्क्वैमस सेल ग्रोथ पन्नास टक्क्यांहून अधिक वाढवते. तसेच काही अभ्यासात आढळले की काही बॅक्टेरियांना कॅन्सरशी जोडले गेले आहे. शरीरात दिवसभर दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.

तोंड नीट साफ न केल्याने कॅन्सरचा धोका अधिक

JAMA ऑन्कोलॉजी मॅगझिनमध्ये यासंदर्भात एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. यात हेल्दी पुरुष आणि महिलांच्या ओरल जर्म्सच्या जेनेटिक स्ट्रक्चरला अभ्यासले गेले. तोंडात नियमित आढळणाऱ्या शेकडो वेगवेगळ्या बॅक्टेरिया पैकी 13 प्रजातींना HNSCC ची जोखीम वाढविणे किंवा कमी करण्यास जबाबदार ठरविले आहे. या गटात कॅन्सरची शक्यता 30 टक्के अधिक आहे. हिरड्यांच्या आजारात नेहमी आढळणारे पाच अन्य प्रजातींच्या कॉम्बिनेशनमध्ये जोखीम 50 टक्के वाढली होती.

किती वेगान वाढतात कॅन्सरच्या पेशी ?

हे बॅक्टेरिया बायोमार्कर म्हणून काम करु शकतात. ज्यामुळे हाय रिस्कची ओळख केली जाऊ शकते. आधीच्या संशोधनात कॅन्सर पिडीत लोकांच्या ट्युमरच्या नमुन्यात काही बॅक्टेरियाचा शोध लागला होता. साल 2018 च्या सध्याच्या रिसर्च टीम शोध लावला की प्रयोगातील हेल्दी लोकांत बॅक्टेरिया काळानुरुप एचएनएससीसी येणाऱ्या जोखीमेत वाढ करु शकतात हे आढळल्याचे NYU ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये पॉपुलेशन हेल्थ डिपार्टमेंटमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो क्वाक यांनी सांगितले.

रेग्युलर ब्रश करा

आपल्या दातांना दररोज ब्रश करावा आणि फ्लॉसिंग करावे. यामुळे केवळ पिरोयडोंटल आजार थांबणार नाहीत तर डोकं आणि मानेच्या कॅन्सरपासून देखील बचाव होईल. ओरल हेल्थबाबत कोणतीह हलगर्जी महागात पडू शकते.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार