विधानसभेवेळीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा

विधानसभेवेळीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा

लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत. शासनाने यापूर्वीच्या आदेशान्वये 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. परंतु, आता निवडणूक घेण्याचा निर्णय आणि प्रक्रिया सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीनेच राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही धुराळा उडणार आहे.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार राज्य स्तरावर निवडणुका सुरू होण्यामध्ये अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716, क वर्गातील 12250 आणि ड वर्गातील 15435 मिळून 29 हजार 443 सहकारी संस्थांचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पुणे शहरातील 828 आणि पुणे जिल्ह्यातील 2220 मिळून एकूण 3 हजार 48 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

प्राधिकरणाच्या आयुक्त डॉ. अनिल कवडे यांनी या निवडणुकांचे आदेश काढले आहेत. त्यानुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीस स्थगिती दिलेली आहे, अशा सहकारी संस्था वगळून शासनाच्या आदेशान्वये सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यापासून दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू कराव्यात. अ आणि ब वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 मधील तरतुदीनुसार तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर करावा, असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. त्याचवेळी सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियादेखील सुरुवात असल्याने एकाच वेळी या दोन निवडणुका घेणे, तसेच राजकीयदृष्ट्या राज्यात असणारे विधानसभा निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता या निवडणुका खरोखरच होतील का? याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी
Central Railway Big Update : मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण...
‘माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत’, अक्षय शिंदेच्या वकिलाचा खळबळजनक दावा
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात, दगडी चाळीत काय राजकारण शिजतंय?
‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार मिड वीक एव्हिक्शन; कोणाचा प्रवास संपणार?
Bigg Boss 18: ‘आगे आगे देखो होता है क्या…’, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच गुणरत्न सदावर्तेंची जोरदार टोलेबाजी
Virat vs Anushka: अनुष्का शर्माने विराट कोहलीला केले आउट, संतापलेला विराट म्हणाला, ‘ जा मी नाही खेळत…’
सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस पिताय तर सावधान, शरीराला होतो हा अपाय….