बदलापुरात एकही पुतळा न उभारलेल्या नवख्या शिल्पकाराला शिवरायांच्या पुतळ्याचे कंत्राट,भाजप नगरसेवकाच्या हट्टापोटी 95 लाखांचा खुर्दा

बदलापुरात एकही पुतळा न उभारलेल्या नवख्या शिल्पकाराला शिवरायांच्या पुतळ्याचे कंत्राट,भाजप नगरसेवकाच्या हट्टापोटी 95 लाखांचा खुर्दा

मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा वाऱयाच्या वेगामुळे नव्हे तर मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळल्याचा पर्दाफाश राज्य सरकारच्या समितीनेच केला. असे असताना आता पुन्हा एकदा मिंधे सरकारच्या टेंडर घोटाळय़ामुळे बदलापुरात मालवण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बदलापूरमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नवख्या शिल्पकारावर तब्बल 95 लाखांचा खुर्दा उधळला आहे. 300 ते 400 पुतळे उभारण्याचा अनुभव असणाऱया अनुभवी शिल्पकाराला डावलून भाजप नगरसेवकाच्या हट्टापोटी नगर परिषदेने नवख्या शिल्पकाराला टेंडर दिले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अनुभवी आणि ज्येष्ठ शिल्पकाराची निविदा 32 लाखांनी कमी असतानाही एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नसणाऱयाला वाढीव दराने काम दिल्याने सरकार आणखी एका शिवपुतळय़ाच्या दुर्घटनेचे पाप करणार काय, असा संतप्त सवाल शिवप्रेमींनी केला आहे.

बदलापूर नगर परिषदेच्या वतीने उल्हास नदीच्या काठावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी 20 ऑगस्ट रोजी शिल्पकारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. यानुसार प्रदीप धनवे आणि ललित यांच्या कराहा स्टुडिओने 95 लाख 28 हजार 600, बालाजी पंपनीने 99 लाख 86 हजार, संकेत साळुंखे यांनी 97 लाख 13 हजार 200 तर राजेंद्र आल्हाट यांच्या राज एण्टरप्रायजेस यांनी 63 लाख 13 हजार रुपयांची निविदा भरली. 21 ऑगस्ट रोजी निविदा उघडण्यात येणार होत्या. मात्र नगर परिषदेने 4 सप्टेंबर रोजी निविदा उघडल्या आणि कोणतेही स्पष्टीकरण न देता कराहा स्टुडिओचे अत्यंत नवखे शिल्पकार प्रदीप धनवे यांना पुतळा उभारण्याची वर्कऑर्डर दिली.

आमचा निर्णय झाला आहे

ज्येष्ठ शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन शिल्पकार निवडताना कोणते निकष वापरले याची माहिती विचारली. मात्र गायकवाड यांनी ‘आमचा निर्णय झाला आहे’ या एका वाक्यात आल्हाट यांना वाटेला लावले. यानंतर आल्हाट यांनी खोलात जाऊन माहिती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मुख्याधिकारी मारुती गायकवाड, सिटी इंजिनीयर विजय पाटील आणि भाजप नगरसेवक शरद तेली यांचे कराहा स्टुडिओशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे नवख्या शिल्पकाराला काम दिल्याचा आरोप राजेंद्र आल्हाट यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा ‘एक्स’वर हल्लाबोल
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर पुतळा उभारणीतील सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. त्यांनी ‘एक्स’ या प्लॅटफार्मवर पोस्ट करून मिंधे सरकारवर हल्लाबोल केले आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा उभारणी प्रकल्पात घोटाळा..!

सगळ्यात कमी देकार 63 लाख 13 हजार या राज एंटरप्राइजेस ज्याचा अनुभव 28 वर्षे असून सुमारे 300 पुतळे उभारले आहेत या शिल्पकाराला डावलले, असे आव्हाड म्हणाले.

आणि काम दिले कोणाला दिले?

जादा दराने निविदा भरली आहे ! त्या कराहा स्टूडियोला निविदा रक्कम 95 लाख 28 हजार 600 या शिल्पकाराचे वय आहे सुमारे 28 वर्षे आणि एकही पुतळा उभारणीचा अनुभव नाही. आणि पुन्हा 32 लाख 15हजार 600 रुपये जास्त पैसे कोणाच्या घश्यात?असा सवाल आव्हाड यांनी केला.

शिल्पकार आल्हाट यांचे उपोषण

निविदा उघडण्यास दहा दिवसांचा वेळ का लावला, असा सवाल ज्येष्ठ शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांनी केला. मी 400 पुतळे उभारले. 28 वर्षांचा अनुभव आहे. असे असताना केवळ आर्थिक लाभासाठी मालवणची पुनरावृत्ती करण्याचा घाट घातला जात असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्याने राजेंद्र आल्हाट नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्र्यांचा या नवख्या शिल्पकाराच्या निवडीला छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल आल्हाट यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर
Superstar Rajinikanth Health Update: सुपरस्टार रजनीकांत यांना 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रजनीकांत यांच्या...
चाकण एमआयडीसीतील 50 कंपन्या परराज्यांत, मिंधे सरकारचा नाकर्तेपणा, उद्योगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
Rajinikanth health update – रजनीकांत यांची तब्येत बिघडली, चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल
अदानी मोदींचा देव, ऑर्डर आल्यावर ईडी, सीबीआयला पाठवतात; राहुल गांधी यांचा घणाघात
याह म्हणायला हे काही कॉफी शॉप नाही, सरन्यायाधीशांनी वकिलांना शिकवला शिष्टाचाराचा धडा
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार का? ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅप ढुस्स! अनेक महिला लाभापासून वंचित
हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा मोठा दावा, कोविड काळातील लॉकडाऊनमुळे चंद्राचे तापमान घटले!