‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका

‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका

नांदेड जिल्ह्यातील मनाठा येथे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या आधार कार्डमध्ये काही फेरफार करत त्यांचे पैसे सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप के्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुन्हा लाडकी बहिण योजनेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून त्यावरून सध्या विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून राज्य सरकारला फटकारले आहे. ”सरकारी योजना लोकांच्या फायद्याऐवजी राजकीय फायद्यासाठी जेव्हा आणल्या जातात तेव्हा त्या पापाचे वाटेकरी होण्यासाठी बिळातून अनेक साप बाहेर येतात. लाडकी बहिण योजनेसंदर्भात समोर आलेला हा दुसरा घोटाळा आहे. योजनांच्या प्रचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय, त्याच्या प्रचारसभेत लोकांना आणण्यासाठी पैसे वाटले जातायत आणि आमच्या बहिणींच्या बँक खात्यात जे पैसे जमा व्हायला हवेत त्यावर तिसरंच कुणीतरी डल्ला मारतंय. ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकाने महिलांच्या आधार कार्डमध्ये बदल करून महिलांचे पैसे आधी त्यांच्या पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सदर रक्कम त्याने परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाखोंचा घोटाळा करून सदर सीएससी सेंटर चालक गावातून पसार झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
  चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना 2022 या वर्षासाठी प्रतिष्ठsचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय माहिती
महापालिका मुख्यालयाजवळील अमर जवान स्मारकाची दैना
जम्मू–कश्मीरमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान; दहशतवादी अफजल गुरू, इंजिनीअर रशीद यांचे भाऊ रिंगणात
जय भीमनगरवर फिरवलेला बुलडोझर महापालिकेला भोवणार, हायकोर्टाचा एसआयटीचा अहवाल सादर
51 टक्क्यांपेक्षा कमी झोपडय़ांची संमती पुनर्विकासासाठी अडचणीची, हायकोर्टाचा निर्वाळा; अट शिथिल केल्यास अनेक विकासक दावा करतील
धारावीच्या मस्जिदमधील बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात, पाच दिवसांत काम पूर्ण करणार
रहिवासी मिंधे सरकारला कोर्टात खेचणार