यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली

यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली

उत्तर प्रदेशात सार्वजनिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरचा अजब कारनामा समोर आला आहे. एका 18 वर्षीय तरुणीच्या डोक्याला टाके घालताना डॉक्टर चक्क सर्जिकल सुई आत ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी याबाबत जाब विचारल्यानंतर हापूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ सुनील त्यागी यांनी सोमवारी या घटनेच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय पथक स्थापन केले आहे.

मुलीच्या डोक्याला टाके घालताना सदर डॉक्टर दारुच्या नशेत होता. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीला नाहक त्रास सहन करावा लागल्याचे तिची आई मीना बेगम म्हणाली.

पीडित तरुणी सितारा हिचे गेल्या आठवड्यात शेजाऱ्यांशी भांडण झाले होते. या भांडणात तिच्या डोक्याला मोठी जखम झाली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिला उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. तरुणीच्या डोक्याला खोल जखम झाल्याने टाके घालावे लागले.

डोक्याला टाके घातल्यानंतर मुलीला घरी सोडण्यात आले. मात्र सिताराला सतत डोकेदुखी होत होती. तिच्या वेदना वाढत चालल्याने कुटुंबीयांनी रविवारी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिचे टाके काढून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. सिताराच्या डोक्यात सर्जिकल सुई आढळली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला योग्य उपचार दिल्याने तिची प्रकृती आता स्थिर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट… स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्री स्वरा भास्कर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. स्वरा भास्करची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला...
अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?
Uttarakhand Accident – चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांची बस उलटली, 12 जखमी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्यांविरोधात आता ED कडून गुन्हा दाखल