Senate Results : बाप को हात लगानेसे पहले, बेटेसे तो निपटले, ठाकरे गटाने डिवचलं

Senate Results : बाप को हात लगानेसे पहले, बेटेसे तो निपटले, ठाकरे गटाने डिवचलं

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांचे सर्व जागांचे निकाल लागले असून 10 पैकी 10 जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. युवासेनेच्या उमेदेवारांनी अभाविपला व्हाईट वॉश दिला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव साजरा केला.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत या विजयाबद्दल आभारा मानले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे तसेच अयोध्या पौळ यांनीही पोस्ट शेअर करत विरोधकांना डिवचलंय. ‘अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! ‘असे म्हणत या नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी मानले आभार

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांना आणि शिवसेना आणि युवा सेनेच्या माझ्या सहकाऱ्यांना, सर्वांना खूप धन्यवाद. तुम्ही दाखवलेला विश्वास, पाठिंबा, घेतलेली मेहनत आणि आशीर्वाद याबद्दल आभारी आहे. आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर आमचा परफॉर्मनस्ही लक्षणीयरित्या सुधारला. इथूनच विजयाची सुरूवात होत्ये! ‘ असे लिहीत आदित्य ठाकरेंनी सर्वांचे आभार मानले.

 

काय म्हणाले अंबादास दानवे ?

सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ट्विट केलं आहे. ‘ अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यानो.. अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! आता करत बसा.. ‘नरेटिव्ह.. नरेटिव्ह..’ अशी खरमरीत टीका दानवे यांनी केली.

 

बाप को हात लगानेसे पहले.. अयोध्या पोळ  यांची खोचक टीका

तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनीही ‘एक्स’ वर एक व्हिडीओ शेअर करत विरोधकांना चांगलंच फटकारलंय. ‘ बाप को हात लगानेसे पहले बेटेसे तो निपटले… आज सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेच्या 10 पैकी 10 जागा निवडून आल्यात, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि भाजप, गद्दार टोळी या सगळ्यांच्या पोटात ( पराभवामुळे) दुखत असेल तर त्यासाठी एखादं औषध घेऊन टाका. हा ( सिनेट निवडणुकांचा निकाल ) तर पक्त ट्रेलर होता, विधानसभेच्या 288 जागांचा, खासकरून गद्दारांच्या जागेवर जो निकाल लागेल, तो पिक्चर महाराष्ट्र अजून पाहणार आहे ‘ अशा शब्दांत अयोध्या पौल यांनी शिंदे गट, भाजपला चांगलच डिवचलंय.

हे उमेदवार जिंकले

युवा सेनेचे मयूर पांचाळ यांना 5350 मते मिळाली. पांचाळ यांनी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला. भुजबळ यांना केवळ 888 मते मिळाली. तर युवासेनेच्या स्नेहा गवळी यांना 5914 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर यांना केवळ 893 मते मिळाली.

शीतल शेठ देवरुखकर यांना 5489 मते मिळाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. सायगावकर यांना 1014 मते मिळाली. युवा सेनेच्या धनराज कोहचडे यांना 5247 मते मिळाली आहेत. अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला. निशा यांना केवळ 924 मते मिळाली. युवासेनेचे शशिकांत झोरे यांना 5170 मते मिळाली आहे. त्यांनी अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केला आहे. अजिंक्य यांना 1066 मते मिळाली.

युवासेनेचे प्रदीप सावंत हे खुल्या प्रवर्गातून हे खुल्या प्रवर्गातून विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते मिळाली आहेत. सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची हॅट्ट्रीक त्यांनी साधली आहे. युवासेनेचे उमेदवार मिलिंद साटम, परम यादव आणि किसन सावंत हे विजयी झाले आहेत. अल्पेश भोईर हे 1137 मते मिळवून विजयी झाले आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये – भाजप नेत्याचा पलटवार ‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये – भाजप नेत्याचा पलटवार
राज्यातील विधानसभा निवडणुकांचं शिंग आता कधीही फुंकलं जाऊ शकतं. निवडणुकांची घोषणा द्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल...
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, कोण आहे याचिकाकर्ता?
प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असते तर भाजप नेस्तनाबूत झाला असता – संजय राऊत
‘धर्मवीर-2’ अत्यंत बोगस, बकवास सिनेमा, दिघेंचं चारित्र्य हनन; संजय राऊत यांची ‘त्या’ सीनवर सडकून टीका
किती साधी माणसं, घरात जाण्याआधी चपला काढल्या; सूरज चव्हाणच्या कुटुंबियांच्या साधेपणाने जिंकली प्रेक्षकांची मनं
मुस्लिम मुलासोबत लग्न, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ‘खड्ड्यात गेली दुनिया, आपण तर प्रेम…’
‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास