मुख्यमंत्री या लाडक्या बहिणीवर खूश, त्या पैशांतून केलेल्या कामामुळे थेट ‘वर्षा’वर बोलवले

मुख्यमंत्री या लाडक्या बहिणीवर खूश, त्या पैशांतून केलेल्या कामामुळे थेट ‘वर्षा’वर बोलवले

राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे. त्यातून काही महिला या छोट्या रक्कमेतून गुंतवणूक करत आहेत. काही व्यवसायाची सुरुवात करत आहे. मुंबईतील एका लाडक्या बहिणीने योजनेतून मिळालेल्या पैशांतून व्यवसाय सुरु केला. दीड हजाराचे दहा हजार केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रकार समजल्यावर त्या महिलेस त्यांनी बोलवून घेतले. तिचे कौतूक केले. तसेच स्वत: पैसे देत तिने सुरु केलेल्या घुंगरुच्या व्यवसायाचे घुंगरु विकत घेतले.

काही केले त्या लाडक्या बहिणीने

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून मिळालेल्या पैशातून आरतीला लागणाऱ्या घुंगरूचा व्यवसाय मुंबईतील एका महिलेने सुरु केला. मुंबईतील काळाचौकी भागात राहणारी लाडकी बहीण प्रणाली कृष्णा बारड हिने हा व्यवसाय सुरु केला. त्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रणाली यांना शुक्रवारी त्यांच्या वर्षा निवासस्थानी बोलवले. यावेळी तिच्यासोबत तिचा सहकारी साईराज परब हादेखील होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीचे विशेष कौतुक केले. तसेच महिलांनी अशाच प्रकारे शासनाने दिलेल्या मदतीचा सदुपयोग एखादा छोटा व्यवसाय करण्यासाठी केल्यास त्यांचाच नाही तर त्यांच्या परिवाराचे आयुष्य बदलू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दीड हजारातून दहा हजारांच्या वर नफा मिळाल्याचे प्रणालीने मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितले.

महिला असे करतात व्यवसाय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही जण म्हणत होते की 1500 रुपयांत काय होऊ शकते. त्या सर्वांना उत्तर प्रणाली बारड या लाडक्या बहिणीने दिले आहे. प्रणाली बारड यांच्याप्रमाणे अनेक महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरु केले आहेत. त्या महिला लाडकी बहीण योजनेतून मिळालेला हा पैसा आपल्या व्यवसायात टाकत आहेत. ते महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये त्यात टाकून व्यवसायाचे भागभांडवल वाढवत आहे. काही महिलांनी गट तयार केला आहे. दहा जण मिळून तीन, तीन हजारांचे ३० हजार करत आहेत. त्यातून नवीन व्यवसाय सुरु करण्याचा संकल्प काही महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

योजनेचे पैसे वाढवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बहिणांना देणारे पैसे आम्ही वाढवत जाणार आहेत. आता दीड हजार देत आहोत. परंतु ते पुन्हा आमचे सरकार आल्यावर दोन हजार करणार आहोत. त्यानंतर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आणखी त्या निधीत वाढ करता येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश...
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती
आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…
Video – राज्याचे गृहमंत्री असुरक्षित! सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली