Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 12 भावांकडून बहिणीचे पैसे लाटण्याचा प्रयत्न, पाहा व्हिडीओ

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 12 भावांकडून बहिणीचे पैसे लाटण्याचा प्रयत्न, पाहा व्हिडीओ

संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं अर्ज सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 12 भावांनी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर महिलांचे फोटो लावून फॉर्म भरल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आलाय.

आता हे आधारकार्ड बघा हे आधारकार्ड अल्तमश अलियरखा पठाण नावाच्या तरुणाचं आहे. या तरुणानं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय. फॉर्मवर नावं सदर तरुणाचे आणि फोटो मात्र एका महिलेचा तसंच फॉर्मवर नाव आणि आधार नंबर देखील सारखाच अशाच प्रकारे अजून 11 फॉर्म भरल्याचं कन्नडमध्ये समोर आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी साताऱ्यात देखील एका व्यक्तीनं लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करत सरकारला चुना लावला होता.

पाहा व्हिडीओ:-

घरी बसून खोटी कागदपत्र देवून साताऱ्यातील एका महाभागानं ७८ हजार रुपये लाटले होते. लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार, ७८ हजार लाटले! बायको एकच मात्र तिच्या नवरोबानं तिचे वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळी हेअरस्टाईल, मेकअप करुन २६ पासपोर्ट फोटो काढून घेतले, याच २६ पासपोर्टफोटोंसोबत विविध २६ महिलांचे आधार कार्ड जोडून अर्ज करण्यात आला. त्या महिलांच्या आधार कार्डसोबत स्वतः मोबाईल नंबरही जोडून घेतला. धक्कादायक म्हणजे हे सव्वीसच्या सव्वीस अर्ज मंजूरही झाले. जिथं फक्त पंधराशेच्या हिशेबानं २ महिन्यांचे ३ हजार जाणं अपेक्षित होतं, तिथं ३ हजारांऐवजी ७८ हजार रुपये गेले.

गुरुवारी खेडमध्ये अजित पवारांनी देखील लाडकी बहीण योजनेचे चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटणाऱ्यांना इशारा दिला होता. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटल्यास कारवाईचा बडगा दाखवणार असल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. यवतमाळ, सातारा आणि संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करण्यात आल्याचं समोर आलंय. दरम्यान चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश...
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती
आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…
Video – राज्याचे गृहमंत्री असुरक्षित! सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली