महाराष्ट्र : राजकीय आखाड्यात तीन बापलेकांची कुस्ती रंगणार ?

महाराष्ट्र : राजकीय आखाड्यात तीन बापलेकांची कुस्ती रंगणार  ?

राजकारणात दोन अधिक दोन कधीच चार होत नाहीत असे म्हटले जाते. येत्या विधानसभा निवडणूकीत पिता-पुत्रांमध्ये राजकीय लढाईची तयारी सुरु झाली आहे.या लढाईत आपल्या पित्या विरोधात गेलेल्या राजकीय वारसदाराचे पहिले नाव शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचे आहे. पिता-पूत्रांच्या लढाईत दुसरे नाव भूषण देसाई यांचे आणि तिसरे नाव गोकुळ झिरवळ यांचे आहे.गोकुळ आणि भूषण यांनी वडीलांच्या विरोधात शड्डू ठोकत दंड थोपटले आहेत. तर ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर यांच्या समोर विधानसभेत शिंदे गटात गेलेले त्यांचे वडील माजी खासदार गजानन कीर्तिकर उभे राहणार का ? याचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा मुंबईचे उत्तर-पश्चिम खासदार गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे गटात सामील झाले. तर त्यांचे पूत्र अमोल कीर्तिकर यांनी वडीलांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाच्या विरोधात लढण्यास माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी नकार दिला त्यामुळे शिंदे गटाने येथे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात रवींद्र वायकर यांना उतरवले होते. शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या कडून खूपच कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणूकीला अमोल कीर्तिकर यांनी न्यायालयात आव्हान देखील दिले आहे. आता विधानसभा निवडणूकीत अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदे गट त्यांचे वडील माजी खासदार गजानन कीर्तिकर यांना उभे करतात काय याची उत्सुकता कायम आहे. एकाच कुटुंबात आई आणि मुलगा ठाकरे सेनेत तर वडील शिंदे सेनेत अशी अवस्था येथे झाली आहे.

सुभाष देसाई यांच्या विरोधात भूषण देसाई

उद्धव ठाकरे यांचे जुने जाणते निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या विरोधात त्यांचा मुलगा भूषण देसाई यांनी लढण्याचा निर्णय घेतला आहे. भूषण देसाई यानी मार्च 2023 मध्ये एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.भूषण रत्नागिरी किंवा मुंबईतील कोणत्याही एका जागेवर उभे राहू शकतात अशी चर्चा आहे. 1990 मध्ये प्रथम आमदार बनलेले सुभाष देसाई शिवसेनेत ज्येष्ठ नेते असून ते युती सरकारमध्ये मंत्री देखील होते. सुभाष देसाई मातोश्रीशी जवळीक आहे. त्यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म मंत्रालय होते.

भूषण हे सुभाष देसाई यांचे तिसरे पूत्र आहेत. सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम उपनगरात शिवसेना वाढली आहे. विशेषत: गोरेगाव येथील मराठी मतदार नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहीले आहेत. यंदाच्या विधानसभेत भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे गट तिकीट देतो की नाही हे लवकरच समजणार आहे.त्यामुळे येथे पिता-पुत्र एकमेकांविरोधात उभे जरी राहीले नसले तर प्रचारमात्र एकमेकांविरोधात करण्याची शक्यता आहे.

पिता नरहरी झिरवल विरोधात गोकुळ

महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतीचे नरहरी झिरवळ दींडोरीचे आमदार आहेत. एनसीपी ( अजित पवार ) गटात ते गेले आहेत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांचे पूत्र मात्र गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. आपल्याला जरी तिकीट दिले नाही तरी दींडोरीत ज्याला कोणाला शरद पवार तिकीट देखील त्याचा प्रचार आपण करणार असे गोकुळ झिरवळ बोलत आहेत. परंतू त्यांनाच तिकीट मिळेल असा अंदाज आहे. अजित पवार यांनी नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीची स्वत:च घोषणा केली आहे.नरहरी झिरव एनसीपीचे दिग्गज नेते आहे.त्यांना 2019 मध्ये शरद पवार यांनी विधानसभेचे उपसभापती बनवले होते.

नरहरी यांना तिकीट मिळताच त्यांचा मुलगा गोकुळ याने अजितदादा गटाला टाटा करीत मोठ्या पवार यांचा हात पकडला आहे.माझे वडील काय राजकीय भूमिका घेतात याच्या मला काही घेणेदेणे नाही. मी महाविकास आघाडीचा प्रचार करेल असे गोकुळ झिरवळ यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या 288 जागांवर वर्षअखेर निवडणूका

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांवर यावर्षअखेर निवडणूका होणार आहेत. येथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची एनसीपी आणि कांग्रेस यांची थेट टक्कर शिवसेना (शिंदे), एनसीपी (अजित) आणि बीजेपी यांच्या महायुतीशी होणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा जादुई आकडा 145 आहे.महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एनडीए निवडणूका लढविणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी? मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची...
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबईत BMC कडून हायअलर्ट जारी, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
महाराष्ट्र : राजकीय आखाड्यात तीन बापलेकांची कुस्ती रंगणार ?
Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं
पवार कुटुंब एकत्र येणार का ? अजितदादा म्हणाले की,’पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही…
बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे काय? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा प्रश्न