आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा तहसील कार्यालयात ठिय्या, कोरे निवेदन दिले

आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा तहसील कार्यालयात ठिय्या, कोरे निवेदन दिले

शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयात ठिय्या देण्यात आला. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महसूल व पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. तहसिलदारांना महिलांच्या हस्ते चक्क कोरे निवेदन देऊन समाजाने आपल्या शासनाप्रति भावना व्यक्त केल्या.

बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आंदोलक तहसिलदारांना निवेदन देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत तहसिल कार्यालयात गेले. महिलांच्या हस्ते त्यांनी निवेदन दिले व तिथेच त्यांनी आपल्या मागण्यांसाठी बैठक दिली. मागण्या मान्य करेपर्यंत कक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नकारात्मक व वेळकाढू मानसिकतेचा निषेध करीत आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय असून ते घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलकांनी प्रशासनासमोर व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या. आंदोलकांच्या मागण्या शासनास कळविण्यात येत असल्याने आंदोलन स्थगित करावे असे पत्र महसूल प्रशासनाच्या वतीने आंदोलकांस देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनादरम्यान तहसिल कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी? मुंबईत पावसाचं रौद्ररुप, शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाची नेमकी काय-काय तयारी?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची...
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबईत BMC कडून हायअलर्ट जारी, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
महाराष्ट्र : राजकीय आखाड्यात तीन बापलेकांची कुस्ती रंगणार ?
Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं
पवार कुटुंब एकत्र येणार का ? अजितदादा म्हणाले की,’पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही…
बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे काय? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा प्रश्न