17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात, घटना धक्क करणारी

17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात, घटना धक्क करणारी

झगमगत्या विश्वात अशा अनेक घटना घडतात, ज्या समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात. प्रसिद्धी झोतात असताना सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या तुफान चर्चा रंगलेल्या असतात. पण जेव्हा त्यांचा अचानक अंत होतो तेव्हा सर्वत्र खळबळ माजते… असंच काही अभिनेत्री सिल्क स्मिता यांच्यासोबत देखील झालं. स्मितासारखी ही गुणवत्ता असलेली दुसरी अभिनेत्री दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत दुर्मिळ आहे. आजही कधीही न भरून येणाऱ्या या अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेऊन 28 वर्षे झाली आहेत. तरी देखील अभिनेत्रीच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात.

घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे स्मिता फक्त चौथीपर्यंत शिकल्या. त्यांचं खरं नाव विजयलक्ष्मी असं होतं. आंध्र प्रदेशातील एलुरू येथील रहिवासी असलेल्या विजयालक्ष्मी नंतर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र असलेल्या चेन्नईच्या कोडंबक्कम येथे राहायला गेल्या. 1978 मध्ये ‘बेदी’ या कन्नड सिनेमातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

1978 मध्ये आलेल्या ‘वंदी चक्र’ या तमिळ सिनेमात रेशमची भूमिका साकारून स्मिता प्रसिद्धी झोतात आल्या. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सिल्क यांच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागू लागली. स्मिता यांनी त्यांच्या 17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.

सिल्क स्मिता यांना प्रोफेशनल आयुष्यामध्ये प्रचंड यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. सिल्क स्मिता यांनी जेव्हा स्वतःला संपवलं, तेव्हा सिनेविश्वात खळबळ माजली होती. अखेरचा श्वास घेत असताना देखील त्यांच्या जवळ कोणीच नव्हतं. वयाच्या 36 व्या वर्षी स्मिता यांनी अखेरचा श्वास घेतला.

23 सप्टेंबर 1996 रोजी स्मिता स्वतःच्या कोडंबक्कम येथील राहत्या घरी मृत अवस्थेत सापडल्या होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. पण सिल्क स्मिता यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला… हे रहस्य आजही गुलदस्त्यात आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा देखील साकारण्यात आला. त्या सिनेमाचं नाव आहे ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture). सिनेमात अभिनेत्री विद्या बालन हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमासाठी अभिनेत्री विद्या बालन हिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रवीना टंडन लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट, मायलेकी ब्लॅक लूकमध्ये आणि… रवीना टंडन लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट, मायलेकी ब्लॅक लूकमध्ये आणि…
अभिनेत्री रवीना टंडन हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रवीना टंडनचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. रवीनाची लेक राशा थडानी...
बलात्काराच्या प्रयत्नात होता तरुण, माकडांनी वाचवले सहा वर्षांच्या मुलीचे प्राण; वाचा सविस्तर…
Photo – व्हाईट हॉट ड्रेसमध्ये शहनाजच्या दिलखेच अदा…
घरातील नात्यांवर निक्कीची भूमिका, अरबाजला दिलेल्या धोक्यावर दिले स्पष्टीकरण
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची गाडी खड्ड्यात अडकते तेव्हा… व्हिडीओ व्हायरल
आमचं सरकार आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाची चौकशी लावू; शरद पवार यांचे प्रतिपादन
आठवड्याचे पहिले सत्र ठरले ऐतिहासिक, सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद