54 वा मजला… किंमत 123 कोटी रुपये…कोणी घेतला मुंबईत आलिशान अपार्टमेंट

54 वा मजला… किंमत 123 कोटी रुपये…कोणी घेतला मुंबईत आलिशान अपार्टमेंट

मुंबईत महागड्या अपार्टमेंटची विक्री झाली आहे. तब्बल 123 कोटी रुपयांमध्ये या अपार्टमेंटची खरेदी झाली आहे. यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे सहयोगी राहिलेले उत्पल शेठ यांनी हे अपार्टमेंट घेतले आहे. राकेश झुनझुनवाला यांची कंपनी रेयर एंटरप्राइजेजचे ते सीईओ आहेत. हे अपार्टमेंट वरळीतील ‘ओबेरॉय थ्री सिक्सटी वेस्ट’ मधील बिल्डिंगमध्ये आहे. राकेश झुनझुनवाला जिवंत असताना उत्‍पल सेठ त्यांचे राइट हँड म्हणून ओळखले जात होते.

7.40 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क

उत्पल सेठ यांनी नुकतेच मुंबईतील सर्वाधिक महागड्या असलेल्या वरळीत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट’ नावाच्या इमारतीत त्यांनी हे अपार्टमेंट खरेदी केले आहे. ही इमारत वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर आहे. या अपार्टमेंटची किंमत 123 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीत 54 व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 15,795 चौरस फूट आहे. यात 884 स्क्वेअर फुटांच्या मोठ्या बाल्कनी आहे. शेठ यांनी त्यांच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांसह हे अपार्टमेंट घेतले आहे. हा करार 15 सप्टेंबर रोजी झाला होता. त्यासाठी 7.40 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे.

अशी आहे ही इमारत

अपार्टमेंट ‘स्कायलार्क बिल्डकॉन’ आणि ‘सहना ग्रुप’च्या ‘मून रे रियल्टी’कडून खरेदी करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या ‘ओएसिस रियल्टी’सोबत एकत्र काम करतात. ‘ओएसिस रियल्टी’ने ‘ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट’ विकसित केले आहे. या करारांतर्गत शेठला ‘ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट’ येथे सात पार्किंग स्लॉटही मिळाले आहेत. टॉवर ए मध्ये 66 मजले आहेत. 28 अपार्टमेंट आहेत. तर टॉवर बी मध्ये 90 मजले आहेत.

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट

शाहिद कपूरने घेतले घर

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये अभिनेता शाहिद कपूर यानेही या ठिकाणी घर घेतले आहे. तसेच रेडियंट लाइफ केअरचे अभय सोई आणि इंडसइंड बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक रोमेश सोबती हे आलिशान घरे खरेदी करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashatra CM : उदंड झाले भावी मुख्यमंत्री; विधानसभेपूर्वीच चर्चा रंगली, पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती? आजी-माजीच नव्हे तर नवख्यांची पण फौज उभी Maharashatra CM : उदंड झाले भावी मुख्यमंत्री; विधानसभेपूर्वीच चर्चा रंगली, पण जनतेच्या मनात कोण व्यक्ती? आजी-माजीच नव्हे तर नवख्यांची पण फौज उभी
विधानसभा निवडणूक 2024 चे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. विविध मुद्दे, आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोटाने राजकारण तापलं आहे. यंदाच्या विधानसभेसाठी पक्षांची संख्या...
जागावाटपाचं सूत्र नेमकं काय ठरलं? काँग्रेस प्रदेशाध्यांकडून महत्त्वाची माहिती, मविआत काय घडतंय?
वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘या’ अभिनेत्रीने केला हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाली, मला माहितीच…
सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी
तिरुपती लाडूचा वाद चिघळला, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आरोप
पंजाबमध्ये आईस फॅक्टरीत गॅस गळती, एकाचा गुदमरून मृत्यू; सहा जणांची सुखरुप सुटका
गणपती विसर्जनादरम्यान भाविकांची बोट समुद्रात उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली