आमदार संजय गायकवाडांनी माझी जमीन बळकावली, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिलेने झळकावले पोस्टर्स

आमदार संजय गायकवाडांनी माझी जमीन बळकावली, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिलेने झळकावले पोस्टर्स

एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करणार्‍या मिंधे सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी एका महिलेची जमीन हडपल्याचे समोर आले आहे. आरोप करीत महिलेने मुख्यमंत्र्यांत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमानंतर मला माझी जमीन परत करा व न्याय मिळवून द्या असे बॅनर भर कार्यक्रमात झळकवले तसेच काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

मोताळा येथे रिता उपाध्ये या महिलेची गट नंबर 62 मध्ये दीड एकर जमीन आहे. ही जमीन आमदार संजय गायकवाड यांनी बळकावली असल्याचा महिलेने आरोप केला. 2021 पासून आमदार गायकवाड यांनी जबरदस्तीने व बेकायदेशीरपणे सदर जमीन ताब्यात घेत त्यातील मुरूम उत्खनन केले व त्यावर फार्म हाऊस बनविले. दिपाली चौबे या महिलेसोबत संगनमताने आमदारांनी ही जमीन हडपली. दरम्यान या प्रकरणी सदर महिला सर्व पुरावे घेऊन न्यायालयात गेली असून न्यायालयाने बुलढाणा आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांकडून 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पीडित महिलेने आज न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बुलढाणा येथील लाडकी बहीण कार्यक्रमानंतर बॅनर झळकवून व काळे झेंडे दाखवून ‘आपल्याच पक्षाचे नेते जर असा अन्याय अत्याचार करत असतील तर महिलांचे काय होणार?’ असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना केला आहे. त्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. फक्त स्वार्थासाठी लाडकी बहीण आहे हे या सरकारच्या व आमदारांच्या कृतीवरुन सिद्ध होते असे रिता उपाध्ये म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार