हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेश क्रिकेट संघाला पायघड्या कशासाठी – आदित्य ठाकरे

हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेश क्रिकेट संघाला पायघड्या कशासाठी – आदित्य ठाकरे

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खोटय़ा असतील तर सोशल मीडियातून आणि माध्यमांतून पसरवल्या जाणाऱया अशा बातम्या हा भाजपने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना?

गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. देवळे, मूर्ती पह्डल्या जात असल्याच्या बातम्या सोशल मीडियातून येत आहेत. भाजपची सोशल मीडियाची इको सिस्टमही हेच सांगत आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत का याचे उत्तर देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने द्यावे आणि तेथे हिंदूंवर अत्याचार होत असतील तर बांगलादेशच्या क्रिकेट संघाला पायघडय़ा कशासाठी? या निर्णयासाठी कोणाचा दबाव आहे, असा प्रश्नांचा भडिमार शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना क्रिकेट मॅच कशासाठी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ माध्यमातून केला. त्यानंतर ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्याबाबत अधिक भाष्य केले. बांगलादेशात बंड झाले आणि शेख हसीना आपल्या देशात आल्या. तेव्हा टीव्ही चॅनेल व सोशल मीडियावर बातम्या आल्या की, ‘ऑल आईज ऑन बांगलादेशी हिंदू.’ तिथे हिंदूवर अत्याचार चालू आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, मूर्ती तोडल्या जात आहेत, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत या सर्व बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात होत्या. एवढेच काय कित्येक ठिकाणी दंगली पेटवण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे नेते व तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी आपल्या देशातील हिंदूंमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न केला. या सगळय़ाच गोष्टी धक्कादायक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांची मजबुरी

बांगलादेशसोबत क्रिकेट सामन्यांवर अनेकजणांनी मला पह्न केले, मेसेज आले. भाजपच्या काही नेत्यांनीही मला मेसेज केले. त्यांनाही आश्चर्य वाटते की, नक्की आपल्या देशात काय चालले आहे ? एक्सवरील माझ्या पोस्टला पोस्टला तुफान प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे कार्यकर्तेही हैराण आहेत. पण मला भाजपच्या कार्यकर्त्यांनाही विचारायचे आहे की तुमची काही मजबुरी आहे का तुम्ही यावर प्रश्न विचारू शकत नाहीत ?

‘यूपीए’ सरकारनेही मॅच होऊ दिली नाही

शिवसेनेने पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचला विरोध केला होता. वानखेडेची खेळपट्टी उखडून टाकली होती याकडे लक्ष वेधले असता, तेव्हा आमची ठाम भूमिका होती की, अतिरेकी कारवाया पाकिस्तानमधून होतात. त्यामुळे त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच नको ही भूमिका होती. त्यानंतर ‘यूपीए’चे सरकार असताना त्या सरकारनेही क्रिकेट मॅच होऊ दिल्या नव्हत्या. पण आता बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे भाजपकडूनच आम्हाला समजते आहे. त्यामुळे यावर स्पष्टता आली पाहिजे. भाजप व भाजपच्या नेत्यांना हे मान्य आहे का?

परराष्ट्र मंत्रालयाला सवाल

दोन महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले आहे की नाहीत ? याचे केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय व भाजपकडून मला उत्तर पाहिजे. मी क्रिकेट मॅचला विरोध केलेला नाही. मी स्पष्टपणे विचारले आहे की, हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाहीत ? बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात तर मग आपण त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच का खेळत आहोत? ते भाजपने सांगावे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

पराजयाच्या भीतीने निवडणुका नाहीत

निवडणुका लांबवण्याच्या मुद्दय़ावरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, हे सर्व निवडणुका भाजप हरत आहे म्हणून सरकार निवडणुका लांबवत आहेत. कारण मुळात यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाही. हरयाणा, जम्मू-कश्मीरमध्ये पराभव होणार. महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड हरणार आहेत. निवडणुकांमध्ये हरायचेच नाही म्हणून निवडणुका घेत नाहीत. हा भाजपचा डाव आहे. हे लोकशाहीला आणि संविधानाला हानीकारक आहे. वन नेशन वन इलेक्शनवर भाजपने कोणत्या पक्षांशी चर्चा केली आहे, असा सवाल त्यांनी यानिमित्ताने केला.

भाजपचे हिंदुत्व निवडणुकांपुरते

केंद्र सरकार भाजपचे आहे, बीसीसीआय भाजपचे आहे आणि भाजपची जी सोशल मीडियाची इको सिस्टम आहे ती आम्हाला सांगत होती की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तीच भाजपची बीसीसीआय किंवा भाजपप्रणीत बीसीसीआय दोन टेस्ट मॅच व दोन टी-20 क्रिकेट मॅच बांगलादेशसोबत खेळणार आहे. म्हणजे नक्की आम्ही समजायचे काय?, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आणि हिंदू आठवतो? आम्ही जे हिंदू आहोत त्यांचा वापर भाजपकडून होतो, असे समजायचे का? भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकांसाठी असलेले हिंदुत्व आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेढ निर्माण करायचा प्रयत्न होतो. आपल्याच देशात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री बॉलीवूड स्टार्ससोबत

कांदिवलीत महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याच्या घटनेकडे आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले असता, नागपूरमध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीवरही अत्याचार झाला आहे. आपल्या राज्यात हे सर्व होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर बॉलीवूडचे स्टार बोलवत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते, पण या विषयासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. तेव्हा राज्याकडे कोण बघणार? पुण्यात गोळीबाराची घटना घडली तेव्हा महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न मी केला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वन नेशन वन इलेक्शन हा विनोद आहे

वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजूर केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, कपिल शर्मा शो हा निवडणूक आयोग चालवायला लागणार आहे. या शोवर निवडणूक आयुक्त येणार आहेत. कारण एका बाजूला जम्मू-कश्मीर आणि हरयाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत. सुरक्षेच्या प्रश्नावरून जम्मू-कश्मीरमध्ये टप्प्याटप्यात निवडणुका घेत आहेत. राज्यात दोन वर्षांपासून तीस महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारत आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले? उद्धव ठाकरेंनी केली घोषणा, म्हणाले “परंपरेप्रमाणे आपण…” ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले? उद्धव ठाकरेंनी केली घोषणा, म्हणाले “परंपरेप्रमाणे आपण…”
Uddhav Thackeray Dussehra Melava : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले...
‘मशाल’ हाती दे…; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत
भाजप श्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकते माप, भाजपमध्ये सुरु झाले ‘नाराजीनाट्य’, नेमके काय आहे कारण?
न्यायदेवेतेकडून न्यायास उशीर होत असल्याने आता जनतेच्या न्यायालयात…उद्धव ठाकरे यांनी निवडला वेगळा मार्ग
समंथामुळे गप्प होतो, पण…; घटस्फोटासंदर्भात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला नाग चैतन्य
एसटीतून फिरणारे आबा मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘हा’ अभिनेता साकारणार गणपतराव देशमुख
एकनाथांच्या नावानं तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं जगदंबेला साकडं