पेजरनंतर वॉकीटॉकी, मायक्रोवेव्ह रेडिओ स्फोटांनी लेबनॉन हादरले; 21 ठार, 3500 जखमी

पेजरनंतर वॉकीटॉकी, मायक्रोवेव्ह रेडिओ स्फोटांनी लेबनॉन हादरले; 21 ठार, 3500 जखमी

इराणच्या पाठबळावर लेबनॉनमधून इस्रायलवर हल्ले करणाऱया हिजबुल्ला दहशतवाद्यांविरुद्ध इस्रायलच्या मोसादने निर्णायक हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारी अचानक लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर्स स्फोटांत 12 जण ठार आणि तीन हजारांहून अधिक जखमी झाले होते. त्यापाठोपाठ आज वॉकीटॉकी, घरातील मायक्रोवेव्ह, छतावरील सोलर सिस्टीम अशा उपकरणांचे स्फोट झाल्याने लेबनॉन हादरले आहे. आजच्या हल्लात 9 जण ठार आणि सुमारे पाचशे जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्यानेही लेबेनॉन सीमेकडे मोर्चा वळवला असून युद्धाच्या नवीन टप्प्याला प्रारंभ झाला असल्याचे इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

पेजर स्फोटांमधील मृतांमध्ये हिजबुल्लाच्या दोन खासदारांचे पुत्र असून, जखमींमध्ये इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी यांचाही समावेश आहे. आज लागोपाठ दुसऱया दिवशी लेबनॉनची राजधानी बेरूत आणि देशाच्या अनेक भागांत वॉकीटॉकी, मायक्रोवेव्ह, रेडिओ आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह सौर उपकरणांचेही स्फोट झाले. लेबनॉनच्या अधिपृत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणालीचा स्फोट झाला. गाझामधील इस्रायल-हमास युद्धात युद्धविराम करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलकडून लेबेनॉनविरुद्ध नवी आघाडी उघडण्यात आली असून नव्या युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

संयुक्त राष्ट्रांचा पॅलेस्टिनसाठी ठराव

इस्रायलने गाझा पट्टी आणि वेस्ट बँक परिसरातून एक वर्षाच्या आत माघार घ्यावी या पॅलेस्टाईनच्या ठरावाला आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने पाठबळ दिले. निर्बंधात्मक नसलेल्या या ठरावासाठी 124 विरुद्ध 14 मते पडली. हिंदुस्थानसह 43 सदस्य अनुपस्थित होते. पॅलेस्टिनच्या राजनैतिक दहशतवादाला पाठिंबा देणारा लज्जास्पद निर्णय, असे याबाबत इस्रायलचे युनोतील राजदूत डॅनी डॅनन यांनी म्हटले आहे.

– हिजबुल्लाचा खासदार अली अम्मार याचा मुलगा पेजर स्फोटात ठार झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेत आज वॉकीटॉकीचा स्फोट झाला. जपानी बनावटीची ही वॉकीटॉकी होती.

– इस्रायलच्या मोसादचा या हल्ल्यांमागे असल्याचे हिजबुल्लाचे म्हणणे आहे. मोसादने पेजर्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांना विध्वंसक अस्त्र बनवले. आखाती देशांतील हा मोठा तांत्रिक हल्ला मानले जात आहे. हे पेजर्स कोडद्वारे ऑपरेट केले जातात. जानेवारीच्या आसपास हे पेजर्स लेबनॉनमध्ये पाठवले गेल्याची माहिती पुढे येत आहे. या पेजर्सवर मंगळवारी मेसेज आला आणि त्यानंतर स्फोट घडले. बुधवारीही आणखी स्फोट घडवण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले? उद्धव ठाकरेंनी केली घोषणा, म्हणाले “परंपरेप्रमाणे आपण…” ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले? उद्धव ठाकरेंनी केली घोषणा, म्हणाले “परंपरेप्रमाणे आपण…”
Uddhav Thackeray Dussehra Melava : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले...
‘मशाल’ हाती दे…; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत
भाजप श्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकते माप, भाजपमध्ये सुरु झाले ‘नाराजीनाट्य’, नेमके काय आहे कारण?
न्यायदेवेतेकडून न्यायास उशीर होत असल्याने आता जनतेच्या न्यायालयात…उद्धव ठाकरे यांनी निवडला वेगळा मार्ग
समंथामुळे गप्प होतो, पण…; घटस्फोटासंदर्भात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला नाग चैतन्य
एसटीतून फिरणारे आबा मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘हा’ अभिनेता साकारणार गणपतराव देशमुख
एकनाथांच्या नावानं तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं जगदंबेला साकडं