Nagar News – पाथर्डीत सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू, अपघाताचे कारण अनभिज्ञ

Nagar News – पाथर्डीत सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू, अपघाताचे कारण अनभिज्ञ

रस्ते अपघातात सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डीत घडली आहे. भगवान मुरलीधर कुटे (35) आणि योगेश शिवाजी कुटे (26) अशी मयत भावांची नावे आहेत. याप्रकरणी पाथर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड करीत आहे.

भगवान कुटे हा मंगळवारी रात्री आपल्या सायकलवरून धामणगावकडे जात होता. तर योगेश कुटे धामणगाववरून पाथर्डीच्या दिशेने दुचाकी घेऊन जात होता. वनदेव डोंगराच्या घाटीतील उतावरावर असलेल्या जुन्या दगड खाणीजवळ दोघांचा अपघात झाला. यात योगेशचा जागीच मृत्यू झाला तर भगवान गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी प्रथम पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात नंतर पुढील उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघात नेमका कसा घडला हे समजू शकले नाही. घटनास्थळी सायकल आणि दुचाकी पोलिसांना अपघाताच्या स्थितीमध्ये आढळून आली. भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने या दोघांना उडवले की दोघांची आपसात धडक झाली, हे समजू शकले नाही. योगेश कुटे याचे पाथर्डीत इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान होते तर भगवान कुटे शेती करून मजुरी करायचा. या घटनेनंतर कुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धाप लागली, घाम फुटला… तिरुपतीच्या दर्शनाला जाताना पवन कल्याण यांची झाली अशी अवस्था धाप लागली, घाम फुटला… तिरुपतीच्या दर्शनाला जाताना पवन कल्याण यांची झाली अशी अवस्था
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी तिरुपती मंदिरात बालाजींचं दर्शन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या...
आणखी एका लोकप्रिय भूमिकेने ‘तारक मेहता..’ला केला रामराम; चाहते नाराज
कळवा हॉस्पिटलमध्ये आले.. पाहणी करून निघून गेले; शिक्षणमंत्र्यांनी मध्यरात्री उडवली विषबाधाग्रस्त विद्यार्थ्यांची झोप
नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी 2 पत्नी, 3 अपत्यांची माहिती लपवून लाभाची पदे उपभोगली!
सर्वोच्च काय, कोणतेच न्यायालय सुरक्षित नाही; चक्क जिल्हा न्यायाधीशांच्या नावाने बनावट आदेश जारी!
Jammu kashmir election- मतदान झालं, पण निकालाआधीच मृत्युनं गाठलं; भाजप उमेदवाराचं निधन