बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला…; गणरायाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला…; गणरायाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवसांच्या बाप्पांना भक्तीभावात निरोप दिल्यानंतर आता मंगळवारी 10 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पांना निरोप देताना भक्तांना हुरहूर लागत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षई लवकर या, अशी विनवणी करत बाप्पांना भक्तीभावात निरोप देण्याची तयारी पूर्म करण्यात आली आहे.

राज्यातील 10 दिवसांच्या गणरायाचे मंगळवारी भक्तीभावात विसर्जन करण्यात येणार आहे. बप्पााना निरोप देताना सोमवारी अनेक मंडळांनी भजन, पूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच आता झाले भजन, आम्ही नमितो तव चरण…गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष अनेक मंडळात सुरू होता. बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात उत्साह असतो, तसाच विसर्जनासाठीही मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलावासंह निर्माल्य कलश आणि इतर तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी राज्यात मोठ्या संख्यने पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

यंदा डीजे आणि लेझर लाईटमुळे काही जणांना इजा झाली होती. त्यामुळे डीजे आणि लेझरवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. तसेच ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठीही मंडळांना अवाहन करण्यात आले आहे. मुंबईत 12२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार ठेवले आहेत. विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापनासाठीही प्रशासनाने तयारी केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 244 सार्वजनिक गणपतींसह आठ हजारांहून घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. तर ठाणे जिल्ह्यात 45 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांत 168 सार्वजनिक, तर 14,330 घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे.रायगड जिल्ह्यात 17 हजार 359 गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय...
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय
शिवाजी पार्क ठाकरेंचेच, मुंबई की ठाणे? शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं नवं ठिकाण ठरलं?
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर एकटेच गेले, राऊत अन् नड्डांचीही झाली भेट, राज्याच्या राजकारणात या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबईतील रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांकडून डीनच्या बदलीचे आदेश, चौकशी समिती गठीत
“नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने…”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले “नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा…”
अमित शाह मुंबईत आले… भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना काय भरला दम?; इन्साईड स्टोरी काय?