शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी… शिवाजी पार्क मंडळाने साकारला अनोखा देखावा

शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी… शिवाजी पार्क मंडळाने साकारला अनोखा देखावा

दादर येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारी नेण्यासंदर्भात अनोखा देखावा साकारला आहे. हा देखावा गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे.

भटक्या विमुक्त जाती आणि लोककलावंतांना पोटासाठी  स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात असा वर्ग हा शिक्षणापासून वंचित राहतो. नव्या शैक्षणिक धोरणामधून अशा वर्गाला ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण शिक्षण देऊन समृद्ध करू शकतो. हाच विचार घेऊन यंदा शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा देखावा साकारला आहे.

आदिवासी लोककलाकारांना लोककलेच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा घेऊन आपण सध्याच्या तांत्रिकी गोष्टींची माहिती दिली तर देखील आधुनिक युगात मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात, असे कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी सांगितले. डोंबारी लोककलेतून कसरत दाखविणारी मुलं उत्तम खेळ खेळणारे क्रीडापटू, निसर्गाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या ऊसतोड कामगारांची मुलं  नैसर्गिक औषधोपचार माहीत असणारे डॉक्टर, पारंपरिकता जपणारी मुलं, उत्तम जेवण बनवणारे आचारी असे एक ना अनेक अवलिया आपल्या देशाला मिळू शकतात, याकडे सुमित पाटील यांनी लक्ष वेधले.

आदिवासी संस्थांना मदत

यंदा मंडळाच्या माध्यमातून शालेयपयोगी वस्तू या बाप्पाला प्रसाद म्हणून आणण्याचे आवाहन भक्तांना करण्यात आले. तसेच अन्य आवश्यक मदत ही मंडळाकडून भटक्या विमुक्त जाती, जमातीसाठी काम करणाऱ्या संस्थांना सढळ हाताने करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय...
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय
शिवाजी पार्क ठाकरेंचेच, मुंबई की ठाणे? शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं नवं ठिकाण ठरलं?
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर एकटेच गेले, राऊत अन् नड्डांचीही झाली भेट, राज्याच्या राजकारणात या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबईतील रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांकडून डीनच्या बदलीचे आदेश, चौकशी समिती गठीत
“नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने…”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले “नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा…”
अमित शाह मुंबईत आले… भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना काय भरला दम?; इन्साईड स्टोरी काय?