बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!: नाना पटोले

बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!: नाना पटोले

आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर
Superstar Rajinikanth Health Update: सुपरस्टार रजनीकांत यांना 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रजनीकांत यांच्या...
चाकण एमआयडीसीतील 50 कंपन्या परराज्यांत, मिंधे सरकारचा नाकर्तेपणा, उद्योगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
Rajinikanth health update – रजनीकांत यांची तब्येत बिघडली, चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल
अदानी मोदींचा देव, ऑर्डर आल्यावर ईडी, सीबीआयला पाठवतात; राहुल गांधी यांचा घणाघात
याह म्हणायला हे काही कॉफी शॉप नाही, सरन्यायाधीशांनी वकिलांना शिकवला शिष्टाचाराचा धडा
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार का? ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅप ढुस्स! अनेक महिला लाभापासून वंचित
हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा मोठा दावा, कोविड काळातील लॉकडाऊनमुळे चंद्राचे तापमान घटले!