विनाअनुदानित शिक्षकांचे 45 दिवसांनंतरही आंदोलन सुरू

विनाअनुदानित शिक्षकांचे 45 दिवसांनंतरही आंदोलन सुरू

राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाचा आज 46वा दिवस असून, 11 दिवस विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. आज सकाळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे खासदार धैर्यशील माने यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपला विषय पूर्णत्वाला जाऊन वाढीव टप्प्याचा जीआर निघणारच आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, असे खासदार माने यांनी सांगितले.

विनाअनुदानित शाळा कृती समिती गेले 46 दिवस रस्त्यावरची लढाई लढत आहे. आंदोलन आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम अविरतपणे कोल्हापूर विभागातून होत आहे. मात्र, जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही, असे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळासह आंदोलनस्थळी जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, शिवाजीराव लोंढे, केदारी मगदूम, वैद्यनाथ चाटे, मुरलीधर कवाडकर, अजय थुल, सचिन चौगुले, युवराज पाटील, सचिन खोंद्रे, जयदीप चव्हाण, अरविंद पाटील, आनंदा चौगुले, संदीप चव्हाण, राजू भोरे, हेमंत धनवडे, विनायक सपाटे, संतोष वाळवेकर, तानाजी आकुर्डे, अवधूत कवडे, भानुदास गाडे, नेहा भुसारी, गौतमी पाटील, भाग्यश्री राणे, नीता सुतार, सुमन नरुटे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

गणराया सरकारला सुबुद्धी दे!

n येत्या कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. वाढीव टप्प्याचा जीआर काढण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे संघटनेने गणपती बाप्पांना घातले आहे. गणपती बाप्पांना जसा आपण आनंदाने निरोप देणार आहोत, तसाच वाढीव टप्प्याचा जीआर काढून आम्हा शिक्षकांना सरकारने अनुदानाचा गोड निरोप पाठवावा, असे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज भंडाऱ्यात सरकारी कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...
‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका
स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, फहादसोबतच्या लग्नाबद्दल आई वडिलांना सांगितल्यावर थेट…
अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?