ठाण्यात नऊ हजार पोलिसांचा २२ तास वॉच; बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

ठाण्यात नऊ हजार पोलिसांचा २२ तास वॉच; बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत वाजतगाजत मिरवणुका निघणार आहेत. या विसर्जन मिरवणुकीवर नऊ हजार पोलिसांचा 22 तास विशेष वॉच ठेवण्यात येणार असून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात राहील. ठाणे शहरासह पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा येथेही संवेदनशील ठिकाणी जादा पोलीस फौजफाटा ठेवला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचादेखील वापर पोलीस करणार असून महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.

700 होमगार्ड ऑन फिल्ड
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वतः रस्त्यावर उतरणार असून पाच परिमंडळांतील चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, ९ डीसीपी, १८ एसीपी तसेच सुमारे १२५ पोलीस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय एसआरपीच्या ५ कंपन्या, ४५०० पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड आणि एक कंपनी रॅपिड अॅक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरातील मुख्य म्हणून नाक्यानाक्यावर, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

150 जणांना तडीपारीच्या नोटिसा
ईद-ए-मिलाद तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १५० हून अधिक जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या वतीने संयुक्त मिशन पोलिसांनी हाती घेतले असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

सीसीटीव्हीची नजर
सोमवारी ईद-ए-मिलादपाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा असल्याने ठाणे पोलिसांनी खास खबरदारी घेतली असून दोन्ही उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. १७ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी जिल्हा, ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३५ हजार ६२३ हून अधिक घरगुती तर १ हजार ५०० सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि संवेदनशील भागात हालचालींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली असल्याची माहिती ठाणे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशी गायी आता ‘राज्यमाता-गोमाता’, शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक?; खेळीमागचं कारण काय? देशी गायी आता ‘राज्यमाता-गोमाता’, शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक?; खेळीमागचं कारण काय?
राज्य सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय...
मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, 30 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार?
अंकिता वालावलकर हिने केले वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल हैराण करणारे भाष्य, लोकांमध्ये संताप, थेट म्हणाली, त्यांच्या घरी…
Ind Vs Ban 2nd Test – टीम इंडियाने गाजवला चौथा दिवस; बांगलादेशच्या बत्त्या गुल, उद्याचा दिवस निर्णायक
आपल्याकडच्या रस्त्यांवरील खड्ड्यात मत्स्यपालन होऊ शकते, भाजप नेत्याला सरकारला घरचा आहेर
टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही…; दलित विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाचे IIT ला निर्देश
राहुल गांधी 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर