‘लेझर’चा वापर; साताऱ्यात तीन मंडळांवर गुन्हा

‘लेझर’चा वापर; साताऱ्यात तीन मंडळांवर गुन्हा

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तसेच मंडळासमोरील सजावटीदरम्यान लेझर बीम लाइट वापरण्यास असणाऱया मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ध्वनिक्षेपक यंत्रणेचा आरोग्यावर तसेच लेझर बीम लाइटचा डोळ्यावर दुष्परिणाम होत असल्याने गणेशोत्सवात याच्या वापरावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बंदी घातली आहे. यानंतरही अनेक मंडळांकडून लेझर बीम लाइटचा वापर सुरू होता. यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक विविध ठिकाणी फिरत होते. यापैकी एका पथकास रविवार पेठेतील लोणार गल्लीत असणाऱया श्रीनाथ गणेशोत्सव मंडळासमोर लेझर बीम लाइटचा वापर सुरू असल्याचे दिसले. याची तक्रार हवालदार सागर निकम यांनी नोंदवली आहे. यानुसार ओंकार संजय कवठेकर (रा. रविवार पेठ) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दुसऱया गस्ती पथकास सदर बझारमधील नवीन म्हाडा कॉलनीतील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातही लेझर बीम लाइटचा वापर सुरू असल्याचे आढळले. यानुसार कैलास सिद्धय्या भंडारे (रा. जरंडेश्वर नाका) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार हवालदार गणेश जाधव यांनी नोंदवली आहे.

तिसऱया पथकाने पिरवाडी येथील यमुनानगरमधील एका मंडळात लेझर बीम लाइटच्या वापरप्रकरणी संतोष लक्ष्मण निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांच्यावर कारवाई करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याची तक्रार हवालदार धीरज मोरे यांनी नोंदवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि… अभिनेत्रीसोबत लिपलॉक केल्याने ट्रोल, आता दिसणार थेट ‘बिग बॉस 18’च्या घरात आणि…
अभिनेत्री निया शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. निया शर्माची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला...
यूपीत डॉक्टरचा प्रताप! जखमेला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई ठेवली
चाकरमान्यांसाठी सूचना! 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेचे टाईम टेबल बदलणार, वाचा सविस्तर…
मिंधे सरकारचे मोठे अपयश… चाकण एमआयडीसीतून 50 कंपन्या गुजरात, आंध्र प्रदेशला स्थलांतरीत?
Uttarakhand Accident – चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांची बस उलटली, 12 जखमी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्यांविरोधात आता ED कडून गुन्हा दाखल
Photo – निऑन यलो गाऊनमध्ये मृणालचा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ