मीरा-भाईंदरमध्ये चिमुकल्यांचे लैंगिक शोषण करून चाईल्ड पोर्नोग्राफीचा धंदा

मीरा-भाईंदरमध्ये चिमुकल्यांचे लैंगिक शोषण करून चाईल्ड पोर्नोग्राफीचा धंदा

चिमुकल्यांचे शोषण करून मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात चाईल्ड पोर्नोग्राफीचा धंदा जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शहरातील सात ठिकाणांवरून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ विविध डार्क साईटवर अपलोड करण्यात आले असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सायबर शाखेने मीरा-भाईंदर पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू केले आहे. हे सर्व व्हिडीओ या भागातील स्टुडिओमध्ये तयार केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने पोलिसांनी शहरातील संशयित स्टुडिओंची झाडाझडती सुरू केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्सप्लॉइड चिल्ड्रन (एनसीएमईसी), नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल एनसीआरपी) आणि महाराष्ट्र राज्य सायबर शाखा यांच्याकडून चाईल्ड पोर्नोग्राफीवर लक्ष ठेवले जात आहे. या तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून विविध वेबसाईट, सर्च इंजिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सॉफ्टवेअरद्वारे प्रतिमांमधील नग्नता शोधली जाते. चेहऱ्याच्या संरचनेद्वारे व्यक्तीचे वय ओळखले जाते. त्यातूनच चाईल्ड पोर्नोग्राफीचे टिप-लाइन अहवाल तयार केला जातो. महाराष्ट्र सायबर शाखेच्या माध्यमातून केलेल्या तपासात मीरा-भाईंदर शहरात मीरा रोड, भाईंदर, अर्नाळा, नालासोपारा, नायगाव आदींसह सात ठिकाणांहून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ डार्क वेबसाईटवर अपलोड झाल्याचे पुढे आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या या चाईल्ड पोर्नोग्राफीच्या अड्ड्यांबाबतची माहिती राज्य सायबर शाखेने मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाला पत्राद्वारे दिली आहे. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे.

पूर्वी अल्पवयीन मुला-मुलींचे व्हिडीओ हे परदेशात बनविले जात होते. मात्र आता ते देशातसुद्धा काही ठिकाणी बनविले जात आहेत. 18 वर्षांखालील मुले-मुली यांच्या पॉर्न व्हिडीओमध्ये रेप, गैंगरेप व अश्लील पद्धतीने अंगप्रदर्शन करणे यासारखे दृश्य असतात. मीरा-भाईंदरमधून डार्क वेबसाईटवर अपलोड झालेले व्हिडीओही याच प्रकारचे आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सायबर शाखेचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी कारवाईसाठी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.

स्वतः गुन्हे दाखल करा

नालासोपारा, अर्नाळा व नायगावसारख्या भागात असलेल्या बेकायदा स्टुडिओत चाईल्ड पोर्नोग्राफी चालत असेल तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल करा, तक्रारदाराची वाट पाहू नका, असे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सात पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेने दिलेल्या सूचनांनुसार उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ आणि सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित गुंजकर हे नजर ठेवून आहेत. पोलिसांनी संशयित ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं
अभिनेत्री कंगना राणौत यांनी त्यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात आम्ही सुचवलेले बदल आणि काटछाट करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाने...
ऐश्वर्या राय हिच्यासोबत घडला हैराण करणारा प्रकार, अभिनेत्रीला पाहताच ‘त्या’ महिलेने थेट…
लाडका पॅडीदादा घरातून बाहेर जाताच सूरजची भावनिक पोस्ट; नेटकरी म्हणाले, रक्तापलिकडचं नातं…
‘आयफा’मध्ये प्रभू देवासोबत शाहिद कपूरचा धमाकेदार डान्स
मला संसार थाटण्यात रस नव्हता, एकाच वेळी अनेकांसोबत संबंध! अभिनेत्रीने स्वतःच केलं उघड
कुत्र्याच्या गुरगुरण्याला बिबट्या समजला अन् पोलिसांसह वनविभागाच्या यंत्रणेलाही कामाला लावलं
बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाची आसाम सरकारला नोटीस; ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश