Latur News – कामाचा बहाणा करून महिलेला लॉजवर बोलवून बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल

Latur News – कामाचा बहाणा करून महिलेला लॉजवर बोलवून बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल

महत्वाचे काम आहे सांगून महिलेला लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना अहमदपूर तालुक्यात घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पीडित महिला 12 सप्टेंबर रोजी अनुदानावर शिलाई मशिनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अहमदपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर थांबली होती. यावेळी गावातील एक ओळखीचा इसम तिच्याजवळ आला आणि महत्वाचे काम आहे सांगून लॉजवर चल सांगू लागला. मात्र महिलेने लॉजवर जाण्यास नकार देत येथेच बोल असे सांगितले. परंतु आरोपीने अतिमहत्वाचे काम आहे सांगून महिलेला लॉजवर घेऊन गेला.

महिलेचे आधारकार्ड दाखवून लॉजवर रुम घेतली. रुममध्ये गेल्यानंतर आरोपीने महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे सांगितले. महिलेने नकार देताच तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तुला काय करायचे ते कर म्हणून तेथून पळून गेला. यानंतर महिलेने अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम 64 बि.एन सह कलम 3 (1) (w) (1) (2), 3 (2)(v) नुसार अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही तर परिवर्तनाची चाहूल; निवडणुकीआधी संजय राऊतांचं विधान चर्चेत ही तर परिवर्तनाची चाहूल; निवडणुकीआधी संजय राऊतांचं विधान चर्चेत
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक निकाल लागला. यात शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. 10 पैकी 10 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय...
आर्यन खान ड्रग्स केसवर पहिल्यांदा शाहरुख खानने सोडलं मौन; म्हणाला, ‘वाईट काळात आम्ही…’
शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे लोकार्पण, सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन; पुण्यात मेट्रो आधीच यायला हवी होती!
माजी नको, आजी नको आम्हाला हवा नवीन बाजी; इंदापुरातील शरद पवार समर्थकांचा हर्षवर्धन पाटील यांना विरोध
महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान, शरद पवार यांनी व्यक्त केला अंदाज
कॅनडात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याशी छेडछाड
मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल, मनोज जरांगे यांचा अमित शहा यांना इशारा