बिग बॉस 18 मध्ये दिसणार या भारतीय क्रिकेटरची माजी पत्नी? कोण आहे ओळखलं का?

बिग बॉस 18 मध्ये दिसणार या भारतीय क्रिकेटरची माजी पत्नी? कोण आहे ओळखलं का?

सलमान खा होस्ट करत असलेला शो बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे सलमा खानने बिग बॉस ओटीटीमधून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग खान यजमानपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. हा रिएलिटी शो ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. एकीकडे, सलमान या सीझनचा होस्ट असेल हे निश्चित झाले आहे, तर दुसरीकडे अनेक स्पर्धकांची संभाव्य यादीही समोर आली आहे. हा सीझन मनोरंजक बनवण्यासाठी निर्माते अनेक बड्या स्टार्सशी संपर्क साधत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अलीकडेच निर्मात्यांनी त्यांच्या शोसाठी भारतीय संघाच्या अष्टपैलू खेळाडूच्या माजी पत्नीशीही संपर्क साधला आहे.

बिग बॉसच्या घरात कोण कोण दिसणार?

बिग बॉस 18 च्या न्यूज पेजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे की या सीझनमध्ये निर्मात्यांनी त्यांच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविकशी संपर्क साधला आहे. मात्र, असा दावाही करण्यात आला आहे की, नताशा या शोमध्ये एकटी येत नसून तिचा जवळचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकही दिसणार आहे. नताशा आणि निर्मात्यांनी अभिनेत्री बिग बॉस 18 चा भाग बनण्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, चाहत्यांच्या मनात प्रश्न उठू लागले आहेत की नताशा बिग बॉसच्या घरात आली तर ती लोकांना तिचे आणि हार्दिकच्या नात्याचे खरे कारण सांगेल का?

नताशा याआधीही शोचा भाग

बिग बॉसच्या घरात नताशा स्टॅनकोविचची एन्ट्री निश्चित झाली, तर ती या वादग्रस्त शोचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, जेव्हा ती तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती, तेव्हा तिने बिग बॉस सीझन 8 मध्ये देखील भाग घेतला होता, परंतु लवकरच ती बाहेर पडली होती. रिपोर्ट्सनुसार, या सीझनची थीम टाइम ट्रॅव्हल आधारित आहे, ज्यामुळे अनेक जुने स्पर्धक सलमान खानच्या नवीन सीझनचा भाग बनू शकतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला...
गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला, नागपुरात हजारो उतरले रस्त्यावर
एआयची कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला संभाव्य ग्राहक कळणार
दिल्लीत प्रदूषणामुळे आणीबाणीसारखी स्थिती; काय कारवाई केली? सर्वोच्च न्यायालयाने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटला फटकारले
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर खासगी क्लास चालक वठणीवर! ग्राहकाला आगाऊ फीचे पैसे केले परत
इस्रायलने केलेहिजबुल्लाहचे मुख्यालय जमीनदोस्त; बैरूतमध्ये स्फोटांचा प्रचंड धूमधडाका, हिजबुल्लाह प्रमुख नसरल्ला होता लक्ष्य
लडाखमधून चीन सैन्य मागे घेणार