Nagar news- नगर जिल्हा बँकेत 700 पदांसाठी भरती

Nagar news- नगर जिल्हा बँकेत 700 पदांसाठी भरती

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्हा सहकारी बँकेने 700 पदांची भरती काढली आहे. ही भरती होताना पारदर्शकपणे राहणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ भरतीच्या पदामध्ये बदल होण्याची शक्यता असून यावर उमेदवारांच्या तक्रारी ग्राह्य धरता येणार नाहीत. भरतीबाबतचे अधिकार हे बँकेने (संचालक मंडळाने) राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे भरती कशा पद्धतीने होणार याची उलटसुलट चर्चा आता सुरू झाली.
जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकेच्या भरती प्रक्रियेबाबत सुरू असणारे चर्चेचे गुर्‍हाळ यामुळे संपणार आहे. उद्या शुक्रवारपासून  इच्छुक उमेदवारांना 27 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या या भरतीतून निवड होणार्‍या उमेदवारांना अनेक परीक्षांसह दिव्य पार केल्यानंतर वर्षभर परिविक्षाधिन कालावधीच्या नावाखाली 12 ते 15 हजार रुपयांत राबवून घेण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेच्या भरतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा ते राज्य आणि सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे. अलिकडच्या काही वर्षात बँकेच्या भरतीसह अनेक बाबींवर शासन, सहकार खात्याच्या यंत्रणेसह राजकीय पातळीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बँकेकडून संचालकांच्या मान्यतेने वारेमाप करण्यात येणारा खर्च यासह बँकेच्या कर्जाचा बिघडलेला कर्जाचा रेशो (मर्यादा) आदी बाबी चर्चेत असताना आता बँकेच्या भरतीचा विषय समोर आला आहे. बँकेच्या लिपिक पदाच्या 687, वाहन चालकांच्या 4 आणि सुरक्षा रक्षकाच्या 5 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे.
बँकेची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पुण्याच्या वर्कवेल इन्फोटेक कंपनीची निवड संचालक मंडळाने केलेली आहे. भरतीसाठी निवड करण्यात आलेल्या कंपनीसह तिच्या निवडीची प्रक्रिया गुलदस्त्यात असतांना आता थेट भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेच्या लिपिक पदासाठी बी. कॉम, एमबीए (बँकिंग, फायनान्स) एलएबी, एलएसएम, डीएलटीसी यासह वाणिज्य विभागातील शिक्षणाची अटक आहे. यासह बँकिंग क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव या भरतीसाठी उमेदवारांना राहणार आहे.
बँकेच्या भरतीबाबत लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर दहा गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत तोंडी पास झाल्यानंतर जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. यातही सुरूवातीच्या वर्षभर लिपिकांना 15 हजारांवर तर वाहन चालक व सुरक्षा रक्षक यांना अवघ्या 12 हजारांत काम करावे लागणार आहे. त्यांचा परिविक्षाधिन कालावधी पूर्ण झाल्यावर ते बँकेच्या सेवत येणार आहेत. दरम्यान त्यांना 3 वर्षे बँकेची नोकरी सोडता येणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज