केंद्र सरकार निगरगट्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी असंवेदनशील; मणिपूरवरून आव्हाडांची टीका

केंद्र सरकार निगरगट्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी असंवेदनशील; मणिपूरवरून आव्हाडांची टीका

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झाले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

एक्सवर पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, मणिपूर पेटले! वर्तमानपत्रातील या हेडलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतकं केंद्र सरकार निगरगट्ट आहे. मणिपूरमधील परिस्थिती चिघळून आता जवळपास १६ महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर असंख्य बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत, शेकडोंनी नागरिक, विद्यार्थी जखमी झालेत, शाळा-महाविद्यालय बंद आहेत, स्वतंत्र भारतात नागरिक सरकारी छावण्यांत राहतायत पण कुणाला कसालाही फरक पडत नाहीए असे आव्हाड म्हणाले.

तसेच देशाच्या पंतप्रधानांना युक्रेन-रशियाचं युद्ध मिटवण्यात स्वारस्य आहे, परंतु ते एकदाही मणिपुरात गेलेले नाहीत. देशाचे सर्वांत ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची नोंद करावी लागेल असेही आव्हाड म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

VIDEO : ‘मी त्यावेळच्या राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? VIDEO : ‘मी त्यावेळच्या राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक नंबर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी चित्रपट क्षेत्राशी...
मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्याणमध्ये वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू
मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा, अडीच तासांपासून ट्रेन नाही?
कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू
पॅरासिटामॉल सह 50 हून अधिक औषधांवर बंदी, या गोळ्या चुकूनही घेऊ नका
मॅट्रीमोनियल साईटवर प्रोफाईल बनवून मैत्री करायचा, लग्नाचे आमिष दाखवून 17 तरुणींची फसवणूक
Mumbai Rain: मुंबईत वेड्यासाराखा पाऊस कोसळला; रस्ते जलमय, रेल्वे वाहतूक मंदावली, विमाने वळवली