पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेमुळे वाहतूक धिम्या गतीने; वेगमर्यादेने गती मंदावली

पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेमुळे वाहतूक धिम्या गतीने; वेगमर्यादेने गती मंदावली

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे मालाड स्थानकात प्रवाशांना चढण्याउतरण्यासाठी फलाटांच्या दिशेत बदल करण्यात आले आहे. कांदिवली ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामावर लोकलच्या वेगावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. सोमवारी लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत होत्या.

पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. आता मालाड स्थानकात सहाव्या मार्गिकेची जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकात फलाटांच्या दिशेत बदल झाले आहेत. तसेच गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान लोकलच्या वेगावर मर्यादा लावण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरू आहे. सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने आणखी आठवडाभर गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे विलंबाने सुरू होती. या कामाबाबतची माहिती रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेट निवडणुकीवरून आशिष शेलारांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाले, राजकीय बोळवण…. सिनेट निवडणुकीवरून आशिष शेलारांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाले, राजकीय बोळवण….
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मागच्या वर्षभरात दोनदा पुढे ढकलण्यात आली. यावरून चर्चांना उधाण आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सिनेट...
अभिनेत्याच्या आयुष्यातील कठीण दिवस, 150 रुपयांमध्ये धुणीभांडी करण्याची आली वेळ, तुम्हाला नाही बसणार विश्वास
Laapataa ladies : ‘लापता लेडीज’च्या शिरपेचात मानाचा तुरा, भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री
‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीच्या पतीचा गंभीर अपघात; आरोग्याविषयी दिली माहिती
अभिषेक बच्चन सोबत घटस्फोटाच्या चर्चा, ऐश्वर्या रायने असं केलं ज्यामुळे सर्वांची बोलती झाली बंद, व्हिडीओ व्हायरल
“मी कसं वागावं हे मला शिकवू नका..”; कोणावर भडकली ऐश्वर्या?
मोहोळ ‘बंद’ने अजितदादांच्या ‘जनसन्मान’चा निषेध