पोटातून काढले 9.7 कोटींचे कोकेन 

पोटातून काढले 9.7 कोटींचे कोकेन 

प्रवाशाने पोटात लपवून आणलेले 9.7 कोटींचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने जप्त केले आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून त्या कोकेनच्या 124 पॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. ड्रग तस्करी प्रकरणी त्या प्रवाशाला डीआरआयने अटक केली.

विमानतळावर ड्रग तस्करीचे प्रकार होऊ नयेत म्हणून सीमा शुल्क विभागाने खबरदारी घेतली आहे. 18 सप्टेंबरला ब्राझील देशाचा नागरिक असलेला प्रवासी साऊ पाउलोहून येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला डीआरआयच्या अधिकाऱ्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत काहीच आढळून आले नाही. कसून चौकशी केल्यावर त्याने पोटातून कोकेन आणल्याची कबुली डीआरआयच्या अधिकाऱ्यांना दिली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. जे. जे. तील डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 124 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 9.7 कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात त्याला काही रक्कम मिळणार होती. त्या प्रवाशाला ते कोकेन कोणी दिले याचा तपास डीआरआय करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पर्यटन स्थळांवर 35 कोटींची अद्ययावत शौचालये, अद्ययावत नऊ शौचालयांसाठी पालिका निविदा काढणार मुंबईच्या पर्यटन स्थळांवर 35 कोटींची अद्ययावत शौचालये, अद्ययावत नऊ शौचालयांसाठी पालिका निविदा काढणार
मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना स्वच्छतागृहांची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने 14 इंस्पिरेशनल शौचालये बांधण्याचा...
वडिलांचे पैसे मुलीला शिक्षणासाठी मिळणारच, एक कोटी देण्याचे आईला आदेश
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
पोटातून काढले 9.7 कोटींचे कोकेन 
कारागृहात असल्याने शिक्षण नाकारता येणार नाही, हायकोर्टाचा निर्वाळा; कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी घेणार कायद्याचे धडे
बिल्डरची फसवणूक फ्लॅटधारकांच्या अंगलट, हायकोर्टाने थांबवले सोसायटी सदस्यत्व
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक