सापासोबत रील बनवायला गेला अन् सर्पदंशाने मेला, नको ते धाडस महागात पडले

सापासोबत रील बनवायला गेला अन् सर्पदंशाने मेला, नको ते धाडस महागात पडले

सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. तरुणाईच्या नको त्या धाडसामुळे अनेकदा त्यांना प्राणाला मुकावे लागते. अशीच एक घटना तेलंगणामध्ये उघडकीस आली आहे. साप तोंडात पकडून रील बनवताना सापाने दंश केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तेलंगणामधील शिवराज नामक यूट्यूबर रस्त्याच्या मधोमध उभा राहून तोंडात कोब्रा पडकून व्हिडिओ बनवत होता. मात्र त्याचा हा व्हिडिओ अखेरचा ठरला. व्हिडिओ बनवत असताना सापाने शिवराजला दंश केला. यात त्याचा मृत्यू झाला.

शिवराज आणि त्याचे वडील साप पकडून आणि सापांना मारून आपला उदरनिर्वाह करत होते. कोब्रा पकडल्यानंतर त्याच्या वडिलांनी सापासोबत व्हिडिओ बनवून त्याला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यास सांगितले. वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे शिवराज कोब्रा तोंडात पकडून व्हिडिओ बनवत होता. मात्र व्हिडिओ बनवत असतानाच सापाने त्याला दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय...
स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
रजनीकांत यांनी केला थेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी…
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना 10 हजार कोटीचा फटका, शंकरराव गडाख यांचा आरोप