सोन्याची झळाळी आणखी वाढणार; जागतिक परिस्थितीमुळे दरात तेजी येण्याची शक्यता

सोन्याची झळाळी आणखी वाढणार; जागतिक परिस्थितीमुळे दरात तेजी येण्याची शक्यता

सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होत असल्याने वातावरण उत्साही राहणार आहे. तसेच गुंतवणूकदारांसाठीही या महिन्यात चांगली संधी आहे. या महिन्यात सुमारे 12 आयपीओ येत आहेत. त्यामुळे या आयपीओमधून तसेच शेअर बाजारातूनही चांगली कमाई होणार आहे. तसेच अर्थसंकल्पानंतर सोन्याचे भाव गडगडले होते. आता आगामी काही महिन्यात सोन्याला झळाळी येणार असून सोन्याच्या दरात चांगली वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जागितक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करून येत्या तीनचार महिन्यात चांगला नफा कमावण्याची संधी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा जगभरातील गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आगामी वर्षाच्या सुरुवातीला सोनं 2,700 डॉलरवर पोहोचू शकतं. सध्या जागतिक बाजारात सोन्याच्या दर एक टक्क्याने वाढला असून तो 2,507 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. आगामी पाच ते सहा महिन्यांत सोन्यााच दर साधारण 7-8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानातील सराफा बाजारात शुक्रवारी एमसीएक्सवर सोनं 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होतं. देशातील सोन्याचा भावही जागतिक घडामोडींमुळे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 5-6 महिन्यांत सोनं 7-8 टक्क्यांनी वाढू शकतं. म्हणजेच आगामी वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर 78 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले बाहेरच्या लोकांना आम्ही का कड्यावर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय...
स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या- राज ठाकरे कडाडले
रजनीकांत यांनी केला थेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी…
सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास
Nagar News – नगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा आरोप
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखान्यांना 10 हजार कोटीचा फटका, शंकरराव गडाख यांचा आरोप