मोठी नामुष्की, मुंबई विद्यापीठाने स्वत:चं नाव चुकीचं छापलं, 1.64 लाख पदवी प्रमाणपत्रांचा कचरा ?
देशातीलच नव्हे तर जगातील नावाजलेले मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांच्या प्रमाणपत्रावर मुंबईची स्पेलिंग चुकीचे छापल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये हडकंप माजला आहे. mumbai चे स्पेलींग ‘Mumabai’असे चुकीचे प्रसिद्ध झाल्याने विद्यापीठाच्या इतक्या वर्षांच्या प्रतिष्ठेला बट्ट्या लागला आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना स्वातंत्र्याचे पहिले समर जेव्हा सुरु झाले त्या 1857 साली झाली होती. या विद्यापीठातून अनेक मानवंत ग्रॅज्युएट झाले आहेत.
साल 2023-24 या शैक्षणिक वर्षात मुंबई युनिव्हर्सिटीतून एकूण 1.64 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत. दीक्षांत समारंभात जेव्हा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटण्यात आली तेव्हा त्यावर ‘Mumbai’ ऐवजी ‘Mumabai’ असे प्रिंट झाल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. झालेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुंबई यूनिव्हर्सिटीतून शैक्षणिक वर्ष 2023-24 मधून पदवी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यातील मुंबईचे स्पेलींग ‘Mumabai’ असे छापलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. या टायपो एररने विद्यार्थी आणि प्रोफेसर देखील हैराण झाले आहेत. त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. तर विद्यापीठ प्रशासनाने झालेल्या प्रकाराबद्दल दीलगिरी व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बदलून दिली जातील असे म्हटले आहे. शिवाय या चुकीच्या प्रमाणपत्राच्या बदल्यात नवीन प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचे कोणतेही नवे शुल्क आकारले जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.
1.64 लाख विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटवर चुकीचे प्रिंटिंग?
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये मुंबई यूनिव्हर्सिटीमधून एकूण 1.64 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत.यापैकी किती विद्यार्थ्यांना अशी चुकीची पदवी प्रमाणपत्रे मिळाली आहेत याची कोणतीही आकडेवारी मिळालेली नाही..विद्यापीठाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजगी जाहीर केली आहे.या चुकीच्या स्पेलींगची प्रमाणपत्रे सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहेत.
मुंबई विद्यापीठाचा खुलासा
हा केवळ एक प्रिंटिंग एरर आहे. ज्यामुळे काही प्रमाणपत्रांवर अशा प्रकारे चुकीचे प्रसिद्ध झाले आहे. या प्रमाणपत्रांना मागे घेतले जात असून यात बदल करुन विद्यार्थ्यांना नव्याने पदवी प्रमाणपत्रे जारी केली जातील असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List